ना श्रेय मिळेल ना नोबेल पारितोषिक; खंत व्यक्त करत हिंदुस्थान- पाकिस्तान युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा पुनरुच्चार

ना श्रेय मिळेल ना नोबेल पारितोषिक; खंत व्यक्त करत हिंदुस्थान- पाकिस्तान युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा पुनरुच्चार

हिंदुस्थान-पाकिस्तानमधील युद्ध थांबवल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेकदा केला आहे. त्यातच आता हे युद्ध थांबवल्याबाबत नोबेल पारितोषिक मिळावे, अशी ट्रम्प यांची इच्छा असल्याचे दिसून येत आहे. पाकिस्तानचे फिल्ड मार्शल असीम मुनीर यांनी ट्रम्प यांना नोबेल पारितोषिक मिळायला हवे, अशी वक्तव्य केल्यानंतर ट्रम्प यांना शांतीदूत असल्याचा साक्षात्कार झाला आणि हिंदुस्थान-पाकिस्तान युद्ध थांबवल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची जगभरातील अनेक आघाड्यांवर सुरू असलेली युद्धे थांबवल्याचा दावा केला आहे. आपल्या या कामसाठी आपण नोबेल पारितोषिकासाठी पात्र आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. या दावा करताना त्यांनी हिंदुस्थान आणि पाकिस्तानचे युद्ध थांबवल्याचा पुनरुच्चार केला. हिंदुस्थान पाकिस्तानमधील युद्ध थांबवले तरी आपल्याला श्रेय किंवा त्यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळणार नाही. मी काहीही केले तरी मला नोबेल मिळणार नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली आहे.

ट्रम्प यांनी सोशल मिडीयावर केलेल्या पोस्टमध्ये सहा वेळा नोबेल शांतता पुरस्काराचा उल्लेख केला. यादरम्यान त्यांनी हिंदुस्थान-पाकिस्तानमधील युद्ध थांबवण्याबाबत तसेच रवांडा आणि काँगोमधील करार, सर्बिया आणि कोसोवोमधील युद्धविराम, इजिप्त आणि इथिओपियामधील शांतता प्रस्थापित करण्याबाबत केलेले प्रयत्न, मध्य पूर्व, रशिया-युक्रेन युद्ध आणि इस्रायल-इराण युद्ध थांबवण्याबाबत केलेले प्रयत्न यांचा उल्लेख करत नोबेल शांतता पुरस्कार मिळावा, अशी इच्छा व्यक्त केली. मात्र, या सर्व प्रयत्नांनंतरही मला नोबेल शांतता पुरस्कार मिळणार नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली आहे.

हिंदुस्थानी सरकारने अनेक वेळा स्पष्ट केले आहे की पाकिस्तानसोबत युद्धविराम हा शेजारी देशाच्या विनंतीवरून अमेरिकन सरकारच्या हस्तक्षेपाशिवाय आणि मध्यस्थीशिवाय करण्यात आला होता. तसेच ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानची तंतरली होती आणि त्यांनी युद्धबंदीचा प्रस्ताव ठेवला, त्यानंतर युद्धबंदीचा निर्णय घेण्यात आल्याचे हिंदुस्थानने अनेकदा स्पष्ट केले आहे. मात्र, आता ट्रम्प यांनी नोबेल पारितोषकाची इच्छा व्यक्त करत हिंदुस्थान-पाकिस्तान युद्ध आपणच थांबवल्याचा पुनरुच्चार केला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘‘ॲल्युमिनिअम मॅन ऑफ इंडिया’’ उद्योजक भरत गीते यांना ‘‘महाराष्ट्र उद्योग भूषण’’ पुरस्कार! ‘‘ॲल्युमिनिअम मॅन ऑफ इंडिया’’ उद्योजक भरत गीते यांना ‘‘महाराष्ट्र उद्योग भूषण’’ पुरस्कार!
‘‘महाराष्ट्र उद्योग भूषण पुरस्कार’’ हा केवळ वैयक्तिक सन्मान नसून संपूर्ण उद्योगविश्वासाठी प्रेरणादायी टप्पा आहे.
मोठ्या प्रकल्पांपेक्षा मूलभूत सुविधा सोडविण्यावर भर द्या : खासदार श्रीरंग बारणे 
नागरिकांच्या आरोग्यदायी, सक्रिय आणि आनंदी जीवनशैलीसाठी आवश्यक सार्वजनिक सुविधा उभारण्यावर भर : महापौर रवि लांडगे
पिंपरी-चिंचवडमध्ये उन्नती सोशल फाऊंडेशन तर्फे १००० वृक्षांचे वाटप
Kokan News – प्लास्टिक कचरा गोळा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार बक्षीस; सृजन सायन्स सेंटरचा अभिनव उपक्रम
परतीच्या पावसाने कापलेली भात शेती पुन्हा रुजली, ऑक्टोबर महिना संपला तरीही पाऊस सुरूच
Kokan News – देवरुख येथील सृजन विज्ञान केंद्रात आली अवकाश शास्त्राची नवीन मॉडेल्स