पालिका सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळेंवर कोयता हल्ला; फेरीवाल्याला 7 वर्षे सक्तमजुरी, ठाणे न्यायालयाचा निकाल

पालिका सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळेंवर कोयता हल्ला; फेरीवाल्याला 7 वर्षे सक्तमजुरी, ठाणे न्यायालयाचा निकाल

ठाणे महानगरपालिकेच्या तत्कालीन सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर चार वर्षांपूर्वी कोयत्याने हल्ला करणाऱ्या फेरीवाल्याला आज न्यायालयाने सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. अमरजितसिंह यादव असे हल्ला करणाऱ्याचे नाव असून या निकालामुळे दादागिरी करणाऱ्या फेरीवाल्यांना तडाखा बसला आहे. यादव याने पिंपळे यांच्यासह त्यांचे अंगरक्षक सोमनाथ पालवे या दोघांवर कोयत्याने प्राणघातक हल्ला केला होता.

‘त्या’ दिवशी काय घडले?

कासारवडवली येथे 30 ऑगस्ट 2021 रोजी माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्या नेतृत्वाखाली अतिक्रमण विभागाचे पथक फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी गेले होते. त्याच ठिकाणी अमरजितसिंह हा फेरीवालादेखील व्यवसाय करायचा. त्याने पालिकेच्या कारवाईला विरोध करत पालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाशी हुज्जत घातली. एवढेच नव्हे तर संतापलेल्या या फेरीवाल्याने कोयत्याने कल्पिता पिंपळे यांच्या हातावर वार केले. अंगरक्षकालादेखील मारहाण केली. या हल्ल्यात पिंपळे यांची दोन बोटे तुटली.

हल्ल्यानंतर अमरजितसिंह यादव याला पोलिसांनी तत्काळ अटक केली. याप्रकरणी २१ साक्षीदार तपासले. आज अखेर चार वर्षांनंतर न्यायमूर्ती आशुतोष भागवत यांनी निकाल दिला असून हल्लेखोर अमरजितसिंह यादव याला सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. याप्रकरणी विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी महिला अधिकाऱ्यावर झालेला हल्ला किती गंभीर होता हे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

उद्धव ठाकरे यांनी धीर दिला

कल्पिता पिंपळे यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याची तत्कालीन मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली होती. त्यांनी स्वतः फोन करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच त्यांना धीर दिला. ‘ताई तुम्ही काळजी करू नका, तुमच्यावर हल्ला करणाऱ्याला कठोर शासन केले जाईल. हल्लेखोराला कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही, असा शब्दही दिला होता. या खटल्यासाठी उद्धव ठाकरे यांनी विशेष सरकारी वकील म्हणून शिशिर हिरे यांची नियुक्ती केली होती.

रेकॉर्डब्रेक वेळेत खटला संपला

हा खटला रेकॉर्डब्रेक वेळेत संपवला आहे. अशा प्रकारचे हल्ले होत असतील तर संपूर्ण समाज व्यवस्थाच कोसळून पडेल असे आम्ही न्यायालयाच्या निदर्शनास आणले. सात वर्षांची आरोपीला ठोठावलेली शिक्षा कमी वाटते. त्यामुळे कदाचित अपिलात जाण्याचा निर्णय घेऊ.

शिशिर हिरे (विशेष सरकारी वकील)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;