Israel-Iran War – इराणच्या अणुकार्यक्रमाबाबत तुलसी गॅबार्ड आणि गुप्तचर यंत्रणा चुकली; ट्रम्प यांची मोठी माहिती

Israel-Iran War – इराणच्या अणुकार्यक्रमाबाबत तुलसी गॅबार्ड आणि गुप्तचर यंत्रणा चुकली; ट्रम्प यांची मोठी माहिती

इस्रायल-इराण युद्धाची तीव्रता आता वाढत आहे. त्यातच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या युद्धात थेट हस्तक्षेप करण्याबाबतचा निर्णय दोन आठवडे पुढे ढकलला आहे. त्यामुळे जागतिक चिंता वाढली आहे. आता ट्रप यांनी मोठा दावा करत इराणच्या अणुकार्यक्रमाबाबत राष्ट्रीय गुप्तचर संचालक तुलसी गॅबार्ड यांची माहिती चुकीची होती. तसेच याबाबत आपली गुप्तचर यंत्रणाही चुकली, असे विधान ट्रम्प यांनी केल्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी इराणच्या अणुकार्यक्रमावरील गुप्तचर मूल्यांकन नाकारले. तसेच राष्ट्रीय गुप्तचर संचालक तुलसी गॅबार्ड चुकीच्या होत्या आणि आपली गप्तचर यंत्रणाही चुकल्याचे सांगितले. न्यू जर्सीमध्ये पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले, आपल्या गुप्तचर यंत्रणची माहिती आणि निष्कर्ष चुकीचा होता. तसेच याबाबत गॅबार्ड यांचीही तूक झाल्याचे त्यांनी सांगितले. दोन्ही देशांमध्ये युद्ध तीव्र होत असतानाच ट्रम्प यांनी हे विधान केले आहे.

मार्चच्या सुरुवातीला गॅबार्ड यांनी सांगितले होते की, अमेरिकन गुप्तचर संस्थांना वाटते की इराणने अण्वस्त्रे बनवण्याचा निर्णय घेतला नाही. त्यांची ही माहिती चुकीची होती. यावेळी ट्रम्प यांनी इराणच्या अणुऊर्जेच्या दाव्यांवरही टीका केली. ते म्हणाले की इराणकडे जगातील सर्वात मोठा तेलसाठा असताना त्यांनी नागरी वापरा आणि विकासासाठी अणुऊर्जेची आवश्यकता का आहे? त्यामुळे या दाव्यात तथ्य नसल्याचेही ते म्हणाले.

अमेरिकेला आगामी बैठकीपूर्वी नाटोच्या प्रस्तावित संरक्षण खर्चाचे लक्ष्य पूर्ण करण्याची गरज नाही. नाटो सदस्यांनी प्रत्येक देशाने त्याच्या जीडीपीच्या 5% संरक्षणावर खर्च करण्याच्या प्रतिज्ञावर चर्चा करणे अपेक्षित आहे. आम्ही इतके दिवस नाटोला पाठिंबा देत आहोत. मात्र, काही देश अत्यल्प संरक्षण खर्च देत असल्याची टीका त्यांनी केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

लॉस एंजेलिस पोलिस प्रशिक्षण केंद्रात मोठा स्फोट, तीन उप शेरीफ जागीच ठार लॉस एंजेलिस पोलिस प्रशिक्षण केंद्रात मोठा स्फोट, तीन उप शेरीफ जागीच ठार
अमेरिकेतील लॉस एंजेलिस काउंटी शेरीफ विभागाच्या बिस्केलुझ प्रशिक्षण केंद्रात शुक्रवारी मोठा स्फोट झाला. यात स्फोटात तीन उप शेरीफ अधिकाऱ्यांचा मृत्यू...
केळं खाल्ल्यावर पाणी पिणं योग्य की अयोग्य?
महायुतीच्या काळात कर्जात वाढ, जनतेच्या प्रश्नांवर उत्तर देण्याऐवजी सरकारने काढला पळ; अंबादास दानवेंची टीका
Chhattisgarh News – नारायणपूरमध्ये सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत 6 नक्षलवादी ठार
Mumbai News – बँकॉकहून मुंबईत गांजा तस्करी प्रकरणी मुंबई विमानतळावर प्रवाशाला अटक, सीमाशुल्क विभागाची कारवाई
Photo – सई… बोल्ड अ‍ॅण्ड ब्युटिफुल
महाराष्ट्रात पहिली ते पाचवी हिंदी आणायचा प्रयत्न तर करून बघा, दुकानं नाही शाळाही बंद करेन; राज ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान