‘एसएसएमबी29’ चित्रपटासाठी 50 कोटींचा सेट, हैदराबादेत बनवले हुबेहुब वाराणसी शहर

‘एसएसएमबी29’ चित्रपटासाठी 50 कोटींचा सेट, हैदराबादेत बनवले हुबेहुब वाराणसी शहर

प्रसिद्ध चित्रपट निर्माते एसएस राजामौली यांच्या आगामी चित्रपट ‘एसएसएमबी29’ ची सध्या शूटिंग सुरू आहे. या चित्रपटासाठी राजामौली यांनी आतापर्यंतचा सर्वात महागडा सेट हैदराबादेत बनवला आहे. यासाठी त्यांनी 50 कोटी रुपये खर्च केले असून हैदराबाद शहरात हुबेहुब वाराणसी शहर बनवण्यात आले आहे. वाराणसीसारख्या दिसणारा शहराचा फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून अनेकांनी राजामौली यांचे कौतुक केले आहे.

राजामौली यांनी ‘आरआरआर’, ‘बाहुबली’ यांसारखे दमदार चित्रपट बनवले आहेत. आता त्यांच्या नव्या ‘एसएसएमबी29’ या चित्रपटाकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. या चित्रपटासाठी वाराणसी शहरातील घाट आणि मंदिरावर शूटिंग करायची असल्याने राजामौली यांनी डिट्टो तसेच दृश्य हैदराबादेत तयार केले आहे. या फिल्म सेटसाठी 50 कोटी रुपये खर्च केल्याचे सांगण्यात येत असून हा हिंदुस्थानी चित्रपटसृष्टीतील सर्वात महागडा सेट असल्याचे बोलले जात आहे. या सेटची किंमत संजय लीला भन्साळी यांच्या ‘देवदास’ या चित्रपटापेक्षाही जास्त आहे. ‘देवदास’ हा हिंदुस्थानातील सर्वात महागड्या चित्रपटांपैकी एक होता.

हैदराबादेत काशी

एसएस राजामौली यांच्या ‘एसएसएमबी29’ चित्रपटाची शूटिंग सुरू करण्यात आली आहे. या चित्रपटात देसी गर्ल प्रियांका चोप्रा, महेश बाबू यांसह अनेक दिग्गज कलाकार दिसणार आहेत. या चित्रपटाची आतापासूनच चर्चा सुरू झाली आहे. शूटिंग करण्यासाठी काशीला जाण्यासाठी राजामौली यांनी हैदराबादेत हुबेहुब काशी तयार केली आहे. राजामौली यांनी 2022 मध्ये ‘आरआरआर’ चित्रपट बनवला होता. यात राम चरण आणि ज्युनियर एनटीआर हे अभिनेते होते. या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याला ऑस्कर अवॉर्ड मिळाला होता.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;