कर्नाटकात आयटी कर्मचाऱ्यांना दहा तास काम

कर्नाटकात आयटी कर्मचाऱ्यांना दहा तास काम

कर्नाटक सरकारने आयटी सेक्टरमधील कर्मचाऱ्यांच्या कामाचे तास दहा तास करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. ओव्हरटाईमसह ही मर्यादा 12 तासांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. नवीन प्रस्तावात सरकारला तीन महिन्यांत ओव्हरटाईम मर्यादा 144 तासांपर्यंत वाढवायची आहे, परंतु या निर्णयाला कर्मचाऱ्यांनी जोरदार विरोध दर्शवला असून या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांची पिळवणूक होणार असून हा निर्णय म्हणजे सरकारकडून कर्मचाऱ्यांवर गुलामगिरी थोपवण्याचाच प्रकार आहे, असा गंभीर आरोप कर्मचारी वर्गांनी केला आहे. जास्त वेळ काम केल्याने कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होईल, असे कर्नाटक आयटी युनियनने म्हटले आहे.

आंध्र प्रदेशात झाली सुरुवात

चंद्राबाबू नायडू यांच्या आंध्र प्रदेश सरकारनेही कंपन्यांना दररोज 9 तासांऐवजी 10 तास काम करण्याची याआधीच परवानगी दिली आहे. तसेच महिलांना रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करण्याची परवानगी आहे. आंध्र प्रदेशात गुंतवणूक वाढवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सरकारचे म्हणणे आहे, परंतु सरकारच्या या निर्णयाला कामगार संघटनांनी विरोध दर्शवला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;