एअर इंडियाच्या विमान अपघाताचं गूढ उकलेना; 9 कोटी खर्च करून उभारलेल्या लॅबमध्ये ‘ब्लॅक बॉक्स’मधील डेटाच रिकव्हर होईना

एअर इंडियाच्या विमान अपघाताचं गूढ उकलेना; 9 कोटी खर्च करून उभारलेल्या लॅबमध्ये ‘ब्लॅक बॉक्स’मधील डेटाच रिकव्हर होईना

एअर इंडियाच्या बोईंग 787-8 ड्रीमलायनर या विमानाचा 12 जून रोजी अपघात झाला. अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनच्या दिशेने जाणारे हे विमान उड्डाणानंतर काही सेकंदात कोसळले. या अपघातामध्ये 270 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला. अपघातानंतर काही दिवसांनी घटनास्थळी ब्लॅक बॉक्सही सापडला. त्यानंतर या विमान अपघाताचे गूढ समोर येईल असे वाटत होते. मात्र या ब्लॅक बॉक्समधील डेटा रिकव्हर करण्यात हिंदुस्थानला यश आलेले नाही.

केंद्र सरकारने 9 कोटी रुपये खर्च करून उभारलेली लॅबही ब्लॅक बॉक्समधील डेटा रिकव्हर करू शकली नाही. विमान अपघातामध्ये ब्लॅक बॉक्सचेही नुकसान झाले आहे. त्यामुळे अपघाताचे कारण शोधण्यासाठी केंद्र सरकारने हा ब्लॅक बॉक्स अमेरिकेला पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने अपघातग्रस्त विमानातील फ्लाइट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हाइस रेकॉर्डर डीकोडिंगसाठी अमेरिकेला पाठवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे हिंदुस्थानने विमानांच्या ब्लॅक बॉक्सचे विश्लेषण करण्यासाठी सुरू केलेल्या अत्याधुनिक लॅबच्या मर्यादा उघड झाल्या आहेत. ‘इकोनॉमिक्स टाइम्स‘ने याबाबत वृत्त दिले आहे.

एअर इंडियाच्या AI171 या बोईंग 787-8 ड्रीमलायनर विमानाचा ब्लॅक बॉक्स नवी दिल्लीतील एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (एएआयबी) च्या डिजिटल फ्लाइट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हाइस रेकॉर्डर (डीएफडीआर आणि सीव्हीआर) प्रयोगशाळेत पाठवण्यात आला होता. दोन महिन्यांपूर्वी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांच्या हस्ते उद्घाटन झाले होते. 9 कोटी रुपये खर्च करून ही लॅब उभारण्यात आली होती.

अपघातग्रस्त विमानाचे ब्लॅक बॉक्स परदेशात न पाठवता त्याचे स्वतंत्रपणे देशातच विश्लेष करण्यासाठी ही लॅब उभारण्यात आली आहे. यामुळे परदेशी तपास यंत्रणांवरील अवलंबित्व कमी होईल आणि तपासात गती येईल अशी अपेक्षा आहे.  याच पार्श्वभूमीवर अहमदाबाद येथे अपघातग्रस्त झालेल्या एअर इंडियाच्या विमानातील ब्लॅक बॉक्स डिकोड करण्यासाठी येथे आणण्यात आला होता. मात्र यात अपयश आले आहे.

विमान अपघातानंतर ब्लॅक बॉक्सचेही मोठे नुकसान झाले आहे. त्यातील डेटा रिकव्हर करणअयासाठी अत्याधुनिक उपकरणांची आवश्यकता असल्याचे लॅबमधील अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे हा डेटा रिकव्हर करून विमान अपघाताचे गूढ उकलण्यासाठी हा ब्लॅक बॉक्स अमेरिकेत पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अपघातात ब्रिटनच्या 53 नागरिकांचाही मृत्यू झाल्याने तपासात यूकेच्या तपास यंत्रणाही सहभागी असणार आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

लॉस एंजेलिस पोलिस प्रशिक्षण केंद्रात मोठा स्फोट, तीन उप शेरीफ जागीच ठार लॉस एंजेलिस पोलिस प्रशिक्षण केंद्रात मोठा स्फोट, तीन उप शेरीफ जागीच ठार
अमेरिकेतील लॉस एंजेलिस काउंटी शेरीफ विभागाच्या बिस्केलुझ प्रशिक्षण केंद्रात शुक्रवारी मोठा स्फोट झाला. यात स्फोटात तीन उप शेरीफ अधिकाऱ्यांचा मृत्यू...
केळं खाल्ल्यावर पाणी पिणं योग्य की अयोग्य?
महायुतीच्या काळात कर्जात वाढ, जनतेच्या प्रश्नांवर उत्तर देण्याऐवजी सरकारने काढला पळ; अंबादास दानवेंची टीका
Chhattisgarh News – नारायणपूरमध्ये सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत 6 नक्षलवादी ठार
Mumbai News – बँकॉकहून मुंबईत गांजा तस्करी प्रकरणी मुंबई विमानतळावर प्रवाशाला अटक, सीमाशुल्क विभागाची कारवाई
Photo – सई… बोल्ड अ‍ॅण्ड ब्युटिफुल
महाराष्ट्रात पहिली ते पाचवी हिंदी आणायचा प्रयत्न तर करून बघा, दुकानं नाही शाळाही बंद करेन; राज ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान