Madhya Pradesh Salary Scam – मध्य प्रदेशात 50 हजार ‘भूतां’चा सरकारी तिजोरीवर डल्ला! 230 कोटींचा घोटाळा उघड

Madhya Pradesh Salary Scam – मध्य प्रदेशात 50 हजार ‘भूतां’चा सरकारी तिजोरीवर डल्ला! 230 कोटींचा घोटाळा उघड

मध्य प्रदेशात शासकीय कर्मचाऱ्यांचा वेतन घोटाळा नुकताच उघडकीस आलेला आहे. एनडीटीव्हीने मिळवलेल्या गोपनीय कागदपत्रांवरून असे दिसून आले आहे की, गेल्या 5-6 महिन्यांपासून 50 हजार शासकीय कर्मचाऱ्यांना वेतन मिळालेले नाही.

मध्य प्रदेशच्या कोषागार आणि लेखा विभागाचे आयुक्त भास्कर लक्ष्मण यांनी 23 मे रोजी सर्व कोषागार विभागाच्या अधिकाऱ्यांना (डीडीओ) लिहिलेल्या पत्राची प्रत नुकतीच सापडली. या पत्रानुसार, 50 हजार कर्मचाऱ्यांचे वेतन डिसेंबर 2024 पासून काढले गेले नाहीत. त्यांचे कोड सक्रिय आहेत परंतु आयएफएमआयएसमध्ये मृत्यू किंवा निवृत्तीची तारीख प्रविष्ट केलेली नाही आणि आयएफएमआयएस पोर्टलवर एक्झिट प्रक्रिया पूर्ण झालेली नाही, तरीही पगार काढला जात नाही. त्यामुळे आता हे कर्मचारी अस्तित्वात आहेत का? असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.

एका वरिष्ठ वित्त अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, एखाद्याचा पगार सहा महिन्यांपासून मिळाला नसेल आणि तो बाहेरही पडला नसेल तर हे संशयास्पद आहे. त्यामुळेच आता प्रत्येक विभागाला उत्तर देण्यासाठी 15 दिवसांचा कालावधी देण्यात आलेला आहे. या यादीत कोण आहे असाच प्रश्न आता निर्माण झालेला आहे. त्यामुळेच आता हे एवढे कोटी नेमके कोणत्या भूतांनी खाल्ले अशीच चर्चा घडू लागली आहे.

एनडीटीव्हीची टीम मध्य प्रदेशचे अर्थमंत्री जगदीश देवडा यांच्या घरी पोहोचली आणि त्यांना “50 हजार कर्मचाऱ्यांचे पगार सहा महिन्यांपासून का दिले गेले नाहीत?” असा प्रश्न विचारताच त्यांनी उत्तर दिले की, कोणतीही प्रक्रिया घडते ती नियमांनुसारच घडते. हा मोठा घोटाळा असू शकतो का?” यावर ते म्हणाले की, जे काही होईल ते नियमांनुसार होईल.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;