नगर तालुक्यातील दक्षिण भागातील ढगफुटीसदृश पावसामुळे हजारो कुक्कुटपक्षी मृत्युमुखी; घरे, गोठ्यांची पडझड, नुकसानीचा अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त

नगर तालुक्यातील दक्षिण भागातील ढगफुटीसदृश पावसामुळे हजारो कुक्कुटपक्षी मृत्युमुखी; घरे, गोठ्यांची पडझड, नुकसानीचा अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त

नगर तालुक्यातील दक्षिण भागात 27 मे रोजी झालेल्या ढगफुटीसदृश पावसाच्या नुकसानीची आकडेवारी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाली आहे. यात वेगवेगळ्या गावांमध्ये हजारो कुक्कुटपक्षी मृत पावले असून, घरांसह जनावरांचे गोठे आणि पशुधनाचे 40 लाख 73 हजार 509 रुपयांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान, नुकसानीच्या या आकडेवारीत कृषी विभागाच्या अहवालाचा समावेश नाही. तो अंतिम झाल्यावर नुकसानीचा आकडा वाढणार असल्याचे सांगण्यात आले.

नगर तालुक्यातील दक्षिण भागात 27 मे रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे वालंबा नदीला पूर आला होता. या पुरामुळे तालुक्यातील खडकी आणि वाळकी या गावांना पुराचा वेढा पडला तसेच अनेक गावांचा काही वेळ संपर्क तुटला होता. या ठिकाणी झालेल्या जोरदार पावसामुळे गेल्या पन्नास वर्षांत पहिल्यांदा नगर-दौंड मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला होता. खडकी गावातील पाच ते सहाजण पुराच्या पाण्याच्या वेढ्यात अडकून पडले होते. या ठिकाणी ट्रॅक्टरसह ट्रॉली वाहून गेली होती. पोलीस आणि लष्कराच्या मदतीने रेस्क्यू ऑपरेशन राबवून अनेकांचे प्राण वाचवण्यात आले होते. मात्र, पशुधन वाचवण्यात अपयश आले होते. दरम्यान, या गावात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाच्या वतीने तालुका प्रशासनाला देण्यात आले होते.

सुमारे आठ ते दहा दिवसानंतर तालुका प्रशासनाला झालेल्या नुकसानीचा अहवाल तयार करता आला आहे. यात ढगफुटीसदृश पावसामुळे 41 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज तालुका प्रशासनाला आहे. या पावसात 55 मोठी दुधाळ जनावरे, 205 लहान दुधाळ जनावरे, पाच ओढकाम करणारे मोठे पशुधन, 1 लहान ओढकाम करणारे पशुधन, 1,170 कुक्कुटपक्षी मृत पावले असून, 192 घरांसह 42 जनावरांच्या गोठ्यांचे नुकसान झाले असल्याची पंचनाम्यात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, या नुकसानीच्या आकडेवारीत नगर तालुक्यातील दक्षिण भागातील शेती पिकांच्या नुकसानीचा समावेश नाही. याबाबत कृषी विभागाकडून सविस्तर अहवाल आल्यावर अंतिम नुकसानीचा आकडा समोर येणार असल्याचे सांगण्यात आले.

पुढील आठवड्यात अंतिम अहवाल
अहिल्यानगर जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या सर्व तालुक्यांतील कृषी आणि महसूलची एकत्रित आकडेवारी पुढील आठवड्यात उपलब्ध होणार आहे. सध्या अनेक ठिकाणी पंचनामे सुरू असून, ते अंतिम झालेले नाहीत. ही आकडेवारी एकत्रित झाल्यावर जिल्ह्यात यंदा अवकाळीत किती नुकसान झाले, याची अंतिम आकडेवारी उपलब्ध होणार आहे.

दोघा मृतांच्या वारसदारांना 8 लाख
27 मे रोजी झालेल्या पावसात नगर तहसील कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात दोघांचा मृत्यू झाला असून, यातील एक नगर शहरातील आहे. या मृत व्यक्तींच्या वारसदारांना प्रत्येकी चार लाख याप्रमाणे आठ लाखांची आर्थिक मदत देण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;