डोंबिवलीत महायुतीत धुसफुस; मिंधे स्वार्थी आणि मतलबी, भाजपचा एक्स पोस्टवरून निशाणा

डोंबिवलीत महायुतीत धुसफुस; मिंधे स्वार्थी आणि मतलबी, भाजपचा एक्स पोस्टवरून निशाणा

कल्याण-डोंबिवलीत भाजप आणि मिंधे गटात धुस्सफुस्स वाढत आहे. महायुती म्हणून वर वर दोन्ही पक्ष गट एकत्र असले तरी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये टोकाचे मतभेद आहेत. मिंधे म्हणजे स्वार्थी आणि मतलबी मित्रपक्ष असा निशाणा साधत डोंबिवलीत भाजपच्या माजी नगरसेवकाने कार्यकर्त्यांच्या मनातील खदखदच एक्स पोस्ट करून बाहेर काढली आहे.

केडीएमसी महापालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर महायुतीतील अंतर्गत विसंवाद आता उघडपणे समोर येऊ लागला आहे. डोंबिवलीत मिंधे गट आणि भाजप यांच्यातील संबंध चांगलेच ताणले आहेत. भाजपचे माजी नगरसेवक मंदार टावरे यांनी मिंधेंच्या कारभाराचा जाहीर निषेध केला आहे. ‘भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी हे पाहावे आणि विचार करावा की, महायुतीचा धर्म आपण जसा पाळतो तसा आपले मित्रपक्ष पाळतात का, भाजपच्या मदतीने सतत मोठ्या मताधिक्क्याने निवडून येणाऱ्यांचेही उद्घाटनाच्या फलकावर नाव नसेल तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा काय सन्मान करणार, असे म्हणत मिंधेंचा चांगलाच समाचार भाजपने घेतला आहे.

नेमके काय बिनसले?
डोंबिवली पूर्वेतील सुनीलनगर येथील वाचनालयाच्या उद्घाटनाशी संबंधित हे प्रकरण आहे. हे वाचनालय खासदार श्रीकांत शिंदे यांच्या निधीतून उभारले आहे. त्यासोबत तुकारामनगरचे शिंदे गटाचे माजी नगरसेवक नितीन पाटील, माजी नगरसेविका रंजना पाटील आणि रवी पाटील यांचेही फोटो आहेत. मात्र या वार्डातील भाजपचे माजी नगरसेवक पप्पू म्हात्रे आणि अलका पप्पू म्हात्रे यांचा या फलकावर उल्लेखही नाही. यामुळे संतापलेल्या माजी नगरसेवक मंदार टावरे यांनी मतलबी आणि स्वार्थी मित्रपक्षाचा जाहीर निषेध केला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;