कोरियाचे राष्ट्रपती समजून ट्रान्सलेटरशी हस्तांदोलन केले; पंतप्रधानांचे जगभर हसू झाले, नेमकं काय घडलं?

कोरियाचे राष्ट्रपती समजून ट्रान्सलेटरशी हस्तांदोलन केले; पंतप्रधानांचे जगभर हसू झाले, नेमकं काय घडलं?

कॅनडातील कनानास्किस येथे नुकतीच जी-7 शिखर परिषद पार पडली. या शिखर परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, युरोपियन काउन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा, कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी, जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा, जर्मनचे चान्सलर फ्रेडरिक मर्झ, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज, दक्षिण कोरियाचे नवनिर्वाचित अध्यक्ष ली जे-म्युंग, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते. या शिखर परिषदेवेळी पंतप्रधान मोदी यांना मागच्या रांगेत उभे करण्यात आले आणि सोशल मीडियावर याची चर्चाही झाली. यावेळी आणखी एक मजेशीर किस्सा घडल्याचे आता समोर आले आहे.

कॅनडात झालेल्या जी-7 शिखर परिषदेवेळी ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांच्यासोबत एक मजेशीर किस्सा घडला. कीर स्टार्मर यांनी दक्षिण कोरियाचे नवनिर्वाचित राष्ट्रपती ली जे-म्युंग समजून त्यांच्या ट्रान्सलेटरशी हस्तांदोलन केले. दोन्ही देशांचे उभय नेते एका अनौपचारिक बैठकीसाठी पोहोचले तेव्हा हा प्रकार घडला. यामुळे थोडा वेळ गोंधळ निर्माण झाला.

ली जे-म्युंग यांनी दोनच दिवसांपूर्वी दक्षिण कोरियाचे राष्ट्रपतीपदाचा पदभार स्वीकारला आहे. ते पहिल्यांदाच जी-7 शिखर परिषदेसाठी आले होते. परिषद झाल्यानंतर ब्रिटनच्या पंतप्रधानांसोबत त्यांची अनौपचारिक बैठक होती. कॅनडातील एका रिसॉर्टमध्ये आयोजित या बैठकीसाठी ते पोहोचले, यावेळी ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी त्यांना सुरुवातीला ओळखले नाही. चुकून त्यांनी दुभाष्याशी अर्थात ट्रान्सलेटरशी हस्तांदोलन केले. मात्र काही क्षणातच त्यांना आपली चूक समजली आणि त्यांनी आपला मोर्चा ली जे-म्युंग यांच्याशी हस्तांदोलन करत त्यांच्याशी चर्चा सुरू केली.

म्हणे विश्वगुरू! पंतप्रधान मोदींना जी-7 शिखर संमेलनात मागच्या रांगेत उभं केलं

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;