मी अजून जिवंत आहे…, संपत्ती हडपणाऱ्या भावाविरोधात महिलेची तक्रार; प्रशासनाने घेतली दखल

मी अजून जिवंत आहे…, संपत्ती हडपणाऱ्या भावाविरोधात महिलेची तक्रार; प्रशासनाने घेतली दखल

संपत्ती हडपण्यासाठी काही लोकं कोणत्याही थराला जातात. खोट्या सह्या, बनावट कागदपत्रांपासून ते जिवंत व्यक्तीला मृत दाखवत त्यांची संपत्ती बळवण्याचा प्रयत्न करतात. आता अशीच एक घटना उत्तर प्रदेशात घडली आहे. चुलत भावाने वडिलोपार्जीत संपत्ती बळकावण्यासाठी चक्क बहिणाला मृत दाखवले. बहिणीचा खोटा मृत्यूदाखला बनवून संपत्ती हडपण्याचा प्लॅन बहिणीनेच उधळून लावला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शारदा देवी असे या माहिलेचे नाव आहे. शारदा देवी यांच्या वडिलांनी एकुलत्या एका मुलीला त्याच्या मृत्यूपूर्वी त्याची सर्व मालमत्ता कायदेशीररित्या दिली होती. दरम्यान काही वर्षांनंतर, तिच्या वडिलांच्या मोठ्या भावाच्या मुलांनी तिची मालमत्ता बळकावण्यासाठी बहिणीलाच मृत घोषित केले. शारदा देवी यांना मृत दाखवण्यासाठी कागदपत्रांमध्ये फेरफार केली आणि मालमत्तेची मालकी स्वतःकडे हस्तांतरित केली.

बनावट कागदपत्रे तयार करून शारदा देवी यांची मालमत्ता हडपण्याचे प्रयत्न सुरू केले. दरम्यान आपल्याच चुलत भावाच्या अशा कारनाम्यांबद्दल समजताच शारदा देवी यांनी तहसीलदाराकडे न्याय मागितला, मात्र तेथून काही मदत न मिळाल्याने शारदा देवी जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे आपली सगळी कागदपत्रे घेऊन गेल्या.

“मी जिवंत आहे आणि तरीही माझी संपत्ती बळकावण्यासाठी मला मृत घोषित करण्यात आले आहे, असे शारदा देवी यांनी जिल्हा दंडाधिकाऱ्यांना सांगितले आणि सगळी कागदपत्रेही त्यांना दाखवली. यावेळी जिल्हा दंडाधिकारी रवींद्र कुमार यांनी शारदा देवी यांचा प्रकरणात गांभीर्याने लक्ष देण्याचे आदेश दिले.

या महिलेनी केलेली तक्रार वैध आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करा आणि एका आठवड्यात अहवाल सादर करा असे आदेश उपविभागीय दंडाधिकारी (एसडीएम) यांना दिले. जर बनावट मृत्यू प्रमाणपत्र वापरल्याचे आढळून आले तर, प्रमाणपत्र जारी करण्यात सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांसह सर्व जबाबदार व्यक्तींवर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;