IND vs ENG – 8 वर्षांनी कमबॅक केलं अन् सामन्याआधी जायबंदी झाला, बरगड्यांवर चेंडू आदळल्यानं स्टार फलंदाजाला दुखापत

IND vs ENG – 8 वर्षांनी कमबॅक केलं अन् सामन्याआधी जायबंदी झाला, बरगड्यांवर चेंडू आदळल्यानं स्टार फलंदाजाला दुखापत

हिंदुस्थान आणि इंग्लंड संघात पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात होणार आहे. दोन्ही उभय संघात पहिला कसोटी सामना हेडिंग्लेच्या लीड्स येथे रंगणार आहे. विराट कोहली, रोहित शर्मा आणि आर. अश्विन यांच्याशिवाय हिंदुस्थानचा संघ शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरणार आहे. मात्र या लढतीपूर्वी शुभमन गिल याच्या चिंतेत वाढ झाली असून तब्बल 8 वर्षानंतर कमबॅक केलेल्या करुण नायरला नेट्समध्ये सराव करताना दुखापत झाली आहे. त्यामुळे तो पहिल्या लढतीला मुकण्याची शक्यता आहे.

करुण नायर याने तब्बल 8 वर्षानंतर कमबॅक केले आहे. विरेंद्र सेहवाग याच्यानंतर त्रिशतक ठोकणारा पहिला खेळाडू ठरलेला करुण नायर इंग्लंड दौऱ्यात टीम इंडियासाठी हुकुमी एक्का ठरण्याची शक्यता आहे. इंग्लंडविरुद्ध झालेल्या दोन लढतीतील तीन डावात त्याने 259 धावा करत आपण सज्ज असल्याचे दाखवून दिले होते. मात्र आता लीड्समध्ये होणाऱ्या पहिल्या लढतीपूर्वी त्याला दुखापत झाली आहे. नेट्समध्ये सराव करताना वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णा याचा चेंडू त्याच्या बरगड्यांवर लागल्याने त्याला दुखापत झाली.

नेमकं काय झालं?

पहिल्या लढतीपूर्वी टीम इंडियाचे खेळाडू सरावासाठी मैदानात उतरले होते. करुण नायरही पॅड बांधून, हेलमेट घालून नेट्समध्ये फलंदाजीचा सराव करत होता. प्रसिध कृष्णा याच्या गोलंदाजीवर तो फलंदाजीचा सराव करत होता. या दरम्यान प्रसिधने टाकलेला एक वेगवान चेंडू खेळताना करुणचा अंदाज चुकला आणि चेंडू थेट बरगड्यांवर आदळला. यानंतर करुण वेदनेने कळवळताना दिसला. अर्थात त्याने पुन्हा उभे राहत नेट्समध्ये सराव केला, मात्र त्यानंतर फिजिओला मैदानात बोलवण्यात आले. चेंडू जोरात लागल्याने त्याला दुखापत झाली आहे. त्यामुळे तो पहिली कसोटी खेळणार की नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

बीसीसीआयकडून अधिकृत माहिती नाही

दरम्यान, करुण नायर याच्या दुखापतीबाबत बीसीसीआयने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. त्याची दुखापत किती गंभीर आहे हे अद्याप समोर आलेले नाही. मात्र तो पहिल्या लढतीपूर्वी फिट व्हावा अशी कामना क्रीडा चाहते करत आहेत.3

नव्या पर्वाचा ‘शुभ’आरंभ, इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या हिंदुस्थानी लढ्याला आजपासून सुरुवात

8 वर्षानंतर संधी

करुण नायर आपला अखेरचा कसोटी सामना 2017 मध्ये खेळला होता. त्यानंतर मध्या काळात देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने धावांचा पाऊस पाडला. त्यामुळे त्याच्यासाठी संघाचे दार पुन्हा उघडले. त्याला इंग्लंड दौऱ्यावर जाण्याची संधी मिळाली. इंग्लंडमध्ये त्याने इंग्लंड लायन्सविरुद्ध 2 लढतीतील तीन डावात फलंदाजी करताना 259 धावा केल्या. त्यामुळे आता त्याचे पुनरागमन लांबू नये अशी क्रीडा चाहत्यांची इच्छा आहे. अर्थात करुण दुखापतीमुळे पहिल्या लढतीला मुकल्या, अभिमन्यू ईश्वरन याला संधी मिळू शकते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पित्ताचे दगड म्हणजे काय? ‘या’ 4 सवयी तुमच्या पित्ताशयातील दगडांना कारणीभूत, जाणून घ्या पित्ताचे दगड म्हणजे काय? ‘या’ 4 सवयी तुमच्या पित्ताशयातील दगडांना कारणीभूत, जाणून घ्या
आता पोट फुगणे, मळमळणे आणि पोटाच्या वरच्या भागात दुखणे यासारख्या समस्या आता 40 किंवा 50 वर्ष वयोगटातील लोकांपुरत्या मर्यादित राहिलेल्या...
कशी वाढवायची उंची? आहार, व्यायाम आणि झोपेच्या ‘या’ टिप्स करतील कमाल
पावसाळ्यात चुकूनही या डाळी खाऊ नका, नाहीतर पोटाच्या आजारांची समस्या वाढेल!
हृदयविकारापासून दूर राहण्यासाठी ‘या’ ट्रिक्स जाणून घ्या
रणथंबोरची प्रसिद्ध वाघीण ‘अ‍ॅरोहेड’चा मृत्यू; मेंदूच्या ट्युमरमुळे वयाच्या 11 व्या वर्षी निधन
IND vs ENG 1st Test – साई सुदर्शनचं पदार्पण; कोहली, द्रविड, गांगुलीच्या खास क्लबमध्ये एन्ट्री!
Air India ला अहमदाबादमधील विमान अपघाताचा मोठा फटका, बुकिंगमध्ये 30 ते 35 टक्के घट