वर्ग सुरू असताना नेरुळमध्ये घडली दुर्घटना; नवी मुंबई पालिका शाळेच्या छताचे प्लास्टर कोसळले; 36 विद्यार्थी बचावले

वर्ग सुरू असताना नेरुळमध्ये घडली दुर्घटना; नवी मुंबई पालिका शाळेच्या छताचे प्लास्टर कोसळले; 36 विद्यार्थी बचावले

नेरुळ येथील सेक्टर ३० मधील महापालिका शाळेतील वर्गाच्या छताचे प्लास्टर कोसळून शिक्षिका जखमी झाल्याची घटना आज सकाळी घडली. यावेळी वर्गात इयत्ता सहावीचे विद्यार्थी बसले होते. मात्र दैव बलवत्तर असल्याने हे सर्वच विद्यार्थी बालबाल बचावले. विशेष म्हणजे महापालिका प्रशासनाने सुमारे आठ कोटी रुपये खर्चुन बांधलेल्या या इमारतीत चालू शैक्षणिक वर्षापासून वर्ग भरवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. शाळा सुरू होऊन चार दिवस उलटले नाही तोच हा प्रकार घडल्याने पालकांमध्ये घबराट पसरली असून पालिकेचा बांधकाम विभाग वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

नेरुळ येथील सेक्टर ३० मधील भूखंड क्रमांक ८ ‘अ’ वर नवी मुंबई महापालिका प्रशासनाने सुमारे आठ कोटी रुपये खर्चुन शाळेची इमारत उभी केली आहे. या इमारतीचे बांधकाम याच वर्षी पूर्ण झाल्यामुळे १६ जूनपासून येथे शाळेचे वर्ग भरवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. आज सकाळी साडेदहाच्या सुमारास पहिल्या मजल्यावरील सहावी ‘क’च्या वर्गात अचानक छताचे प्लास्टर दोन ठिकाणी कोसळले. त्यावेळी वर्गात ३६ विद्यार्थी बसलेले होते. या दुर्घटनेत वर्गातील शिक्षिका जखमी झाल्या. मात्र दैव बलवत्तर असल्याने सर्वच ३६ विद्यार्थी बालबाल बचावले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर शाळा व्यवस्थापन आणि अन्य शिक्षकांनी सहावी ‘क’च्या वर्गाकडे धाव घेतली आणि सर्व विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर काढले. जखमी झालेल्या शिक्षिकेला तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

ठेकेदारावर कडक कारवाई करा
निकृष्ट बांधकामामुळे या शाळेची अवस्था उद्घाटनानंतर काही महिन्यात दयनीय झाली आहे. नवीन बांधकामाला ठिकठिकाणी तडे गेले आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळेत सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात आलेली नाही. याप्रकरणी संबंधित अधिकारी, ठेकेदारावर कडक कारवाई करण्यात यावी. ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपशहरप्रमुख समीर बागवान यांनी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्याकडे केली आहे. याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख सुमित्र कडू उपस्थित होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;