सांगली जिल्ह्यातील 83 प्रकल्पांत 81 टक्के पाणीसाठा

सांगली जिल्ह्यातील 83 प्रकल्पांत 81 टक्के पाणीसाठा

गतवर्षाच्या तुलनेत यंदा पावसाने चांगली साथ दिली आहे. जिल्ह्यात सरासरीहून अधिक पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्यातील 83 प्रकल्पांत आताच 81 टक्के पाणीसाठा झाला आहे, तर 56 प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. उन्हाळ्यापर्यंत पाणी पुरेल, अशी शक्यता पाटबंधारे विभागाने व्यक्त केली आहे.

सांगली जिल्ह्यात पाच मध्यम व 78 लघु असे एकूण 83 पाणी प्रकल्प आहेत. या प्रकल्पांची पाणी साठवण क्षमता 9 हजार 440 दशलक्ष घनफूट इतकी आहे. मात्र, गतवर्षी पावसाने दडी मारल्याने प्रकल्पामध्ये पाणीसाठा कमी झाला होता. जिल्ह्यात जत आणि आटपाडी तालुक्यात टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली होती. गेल्या वर्षी ऑक्टोबरअखेर अवघा 35 टक्के पाणीसाठा शिल्लक होता.

यंदा मे, जून महिन्यापासूनच पावसाने दमदार हजेरी लावली आहे. जिल्ह्यातील 83 प्रकल्पांपैकी 56 प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. खानापूर, तासगाव, आटपाडी, जत आणि कवठेमहांकाळ या दुष्काळी तालुक्यातील हे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेले आहेत. जत तालुक्यातील सर्वाधिक म्हणजेच 15 प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत. त्यामुळे दुष्काळी पट्ट्यातील पाणीटंचाईचा प्रश्न मार्गी लागला आहे. यंदा प्रकल्पात समाधानकारक पाणीसाठा असल्याने उन्हाळ्यापर्यंत पाणी कमी पडणार नाही, असा अंदाज पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;