मुंबई विद्यापीठाचा 40 लॉ कॉलेजेसना दणका, प्रवेशबंदी आणि 1 लाखाचा दंडही, काय आहे प्रकरण ?

मुंबई विद्यापीठाचा 40 लॉ कॉलेजेसना दणका, प्रवेशबंदी आणि 1 लाखाचा दंडही, काय आहे प्रकरण  ?

मुंबई विद्यापीठाने कडक कारवाई करत 40 लॉ कॉलेजेसना प्रवेशबंदी केल्याने त्यांना मोठा दणका बसला आहे. मुंबई विद्यापीठाने 74 पैकी 40 विधी महाविद्यालयांवर ( लॉ कॉलेज) कारवाई करत प्रवेश संख्या शून्य करण्याचा निर्णय घेतला आहे. पूर्णवेळ प्राचार्य आणि प्राध्यापकांची भरती न केल्याने या कॉलेजेसना 1 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. मंबई विद्यापीठाने या महाविद्यालयांना CET प्रवेशासाठी ‘ना हरकत प्रमाणपत्र’ (NOC) देण्यास नकार दिला असून त्यामुळे यंदा तीन व पाच वर्षांच्या एलएलबी अभ्यासक्रमात सुमारे 4 हजार प्रवेश जागा कमी होणार आहेत, अशी माहिती समोर आली आहे.

कॉलेजेसना अचानक दिलेल्या भेटी दरम्यान पायाभूत सुविधा अपुऱ्या आणि गुणवत्तेचा अभाव दिसून आला. मुंबई विद्यापीठाने दंड भरण्यासाठी या कॉलेजेसना 10 दिवसांची मुदत दिली असून तेवढ्या कावलावधीत दंड भरली नाही तर दरमहा 1.5% व्याज आकारले जाणार. मात्र या निर्णया नंतर विद्यार्थी संघटनांनी संपूर्ण महाविद्यालयांवर समान कारवाईची मागणी केली असून विद्यापीठाच्या परवानगी प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले.

मुंबई विद्यापीठाने समिती नेमून काही दिवसांपूर्वी कॉलेजेसना अचानक भेट दिली मात्र तेव्हा कॉलेजमध्ये मान्यता प्राप्त प्राचार्य आणि प्राध्यापकांची नसल्याचे उघड झाले, तसेच पायाभूत सुविधांचाही अभाव होता. यामुळे विद्यापीठानने हा निर्णय घेतला असून लॉ अभ्यासक्रमांच्या 74 पैकी 40 कॉलेजेसना मुंबई विद्यापीठाने नोटिस पाठवली असून 1 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे

तसेच, या महाविद्यालयांची यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून प्रवेशसंख्या शून्य करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विद्यापीठाने या महाविद्यालयांना सीईटी कक्षामार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रवेशांसाठी ना- हरकत (एनओसी) देण्यास नकार दिला आहे. परिणामी यावर्षी तीन आणि पाच वर्षे अभ्यासक्रमासाठी महाविद्यालयांना विद्यार्थ्यांना प्रवेश देता येणार नाही. त्यामुळे लॉच्या जवळपास चार हजारांहून अधिक जागा घटणार आहे

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;