व्हिटॅमिन बी-12 ची कमतरता दूर करण्यासाठी हा शाकाहारी पदार्थ खायलाच हवा! वाचा

व्हिटॅमिन बी-12 ची कमतरता दूर करण्यासाठी हा शाकाहारी पदार्थ खायलाच हवा! वाचा

हिंदुस्थानातील 40% महिलांना अशक्तपणा आहे. याचे एक कारण व्हिटॅमिन बी-12 ची कमतरता असू शकते. अशक्तपणा हा केवळ महिलांमध्येच नाही तर, पुरुषांमध्येही मोठ्या प्रमाणात असतो त्यामुळेच आपल्या शरीरासाठी व्हिटॅमिन बी-12 गरजेचे आहे. व्हिटॅमिन बी-12 हे आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे मानले जाते, त्याच्या कमतरतेमुळे, शरीराला थकवा, अशक्तपणा, मानसिक गोंधळ, मज्जासंस्थेशी संबंधित समस्या आणि अशक्तपणा इत्यादी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. व्हिटॅमिन बी-12 चा विचार येतो तेव्हा मांसाहारी पदार्थाचे नाव प्रथम घेतले जाते. परंतु तुम्ही शाकाहारी असाल तर मूग तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय असू शकतो.

Jaggery Benefits- दररोज गूळ खाण्याचे 9 आरोग्य फायदे, वाचा सविस्तर

मूग डाळ ही एक अतिशय पौष्टिक डाळ आहे, यात प्रथिने, फायबर, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि अनेक जीवनसत्त्वे असतात. या डाळीचे दररोज सेवन केल्याने, शरीराचे अनेक समस्यांपासून संरक्षण होऊ शकते. महिलांनी दररोज एक वाटी ही डाळ नक्कीच खावी. कारण मूग डाळ ही व्हिटॅमिन बी-12 चा चांगला स्रोत आहे आणि ती सहज पचवता येते, त्यामुळे व्हिटॅमिन बी-12 च्या कमतरतेवर मात करण्यासाठी ती एक उत्तम पर्याय बनते.

1- मूग डाळीचे पाणी- रात्री एक कप मूग डाळ पाण्यात भिजत घाला. सकाळी पाणी गाळून प्या. हे व्हिटॅमिन बी-12 च्या कमतरतेवर मात करण्यास मदत करू शकते.

 

2. अंकुरलेले मूग – मूग डाळ कोंब आणुनही खाऊ शकता. तसेच सॅलड किंवा पराठ्यांमध्ये समाविष्ट करून खाऊ शकता. याच्या मदतीने व्हिटॅमिन बी-12 ची कमतरता दूर करता येते.

३. मूग डाळ खिचडी- तुम्ही मूग डाळ खिचडी किंवा डाळ-भात बनवून खाऊ शकता. यामुळे व्हिटॅमिन बी-12 ची कमतरता दूर होण्यास देखील मदत होऊ शकते.

 

४. मूग डाळीचे वरण- मूगाच्या डाळीचे वरण हे सर्वांसाठी खूप पोषक मानले गेलेले आहे. म्हणूनच निरोगी राहण्यासाठी तसेच व्हिटॅमिन बी-12 वाढण्यासाठी मूग डाळीचे वरण आपल्या आहारात असायलाच हवे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;