Operation Sindoor – 20 नव्हे तर दहशतवाद्यांची 28 तळं केली नष्ट, पाकिस्तानकडून कबुली

Operation Sindoor – 20 नव्हे तर दहशतवाद्यांची 28 तळं केली नष्ट, पाकिस्तानकडून कबुली

ऑपरेशन सिंदूर राबवून हिंदुस्थानी सैन्याने पाकिस्तान आणि पाकव्याप्तमधील अनेक दहशतवादी तळं नष्ट केली होती. हिंदुस्थानने दहशतवाद्यांची 20 तळं नष्ट केली होती अशी प्राथमिक माहिती होती. पण 20 नव्हे तर 28 दहशतवादी तळं नष्ट केल्याची कबुली पाकिस्तानने दिली आहे.

ऑपरेशन सिंदूरवेळी हिंदुस्थानने पाकिस्तानच्या अनेक दहशतवादी ठिकाणांना टार्गेट केलं होतं. पण पाकिस्तानने प्रत्युत्तर म्हणून हिंदुस्थानच्या अनेक रहिवासी भागात ड्रोन आणि मिसाईल डागले होते. असे असले तरी हिंदुस्थानी सैन्यांनी त्यांचे मनसुबे उधळून लावले. हिंदुस्थानने पाकिस्तानची अनेक हवाई तळं उद्ध्वस्त केली होती. यात पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले होते.

ऑपरेशन सिंदूरवरून पाकिस्तानने अनेकवेळा खोटं सांगितले आहे. पण आता काही कागदपत्रावरून खरं समोर आलं आहे. त्यानुसार हिंदुस्थानने आत घुसून पाकिस्तानवर हल्ला केला होता. त्यात 20 नव्हे तर 28 ठिकाणी हल्ले करून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले होते. हिंदुस्थानी सैन्याने घेतलेल्या पत्रकार परिषदेत ऑपरेशन सिंदूरमधून कुठे कुठे हल्ले केले याचा उल्लेख केला नव्हता. पण पेशावर, सिंध, झांग, गुजरांवाला, भवालगनर आणि छोर भागात हिंदुस्थानने हल्ला केला होता.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;