गोराई येथील मॅन्ग्रोव्ह पार्क लवकरच सर्वांसाठी खुले होणार; आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले समाधान

गोराई येथील मॅन्ग्रोव्ह पार्क लवकरच सर्वांसाठी खुले होणार; आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले समाधान

गोराई येथील हे मॅन्ग्रोव्ह पार्क लवकरच सर्वांसाठी खुले होणार आहे. महाविकास आघाडीचे सरकार असताना या पार्कचे काम सुरू झाले होते. आता ते लवकरच सर्वांसाठी खुले होत आहे. याबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी समाधान व्यक्त केले आहे. महाविकास आघाडीचे सरकार पाडल्यानंतर या कामाला विलंब झाला. मात्र, आता हे सर्वांसाठी खुले होत असल्याने आनंद होत असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

आदित्य ठाकरे यांनी एक्सवर याबाबत पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, ऑक्टोबर 2021 मध्ये आम्ही सुरू केलेले गोराई येथील हे मॅन्ग्रोव्ह पार्क लवकरच सर्वांसाठी खुले होणार आहे हे ऐकून आनंद झाला. मलबार हिलमधील “ट्री टॉप वॉक”, मरोळमधील “अर्बन फॉरेस्ट” याचे काम महाविकास आघाडीचे सरकार असताना सुरू झाले होते. त्यावेळी प्रायवरणमंत्रई म्हणू ही कामे सुरू करण्याचा मान आणि सौभाग्य आपल्याला मिळाले. आता ते लवकरच लोकांसाठी खुले होणार आहे, याचा आनंद होत आहे. हे पार्क 2023 पर्यंत सर्वांसाठी खुले करण्याचे उद्दीष्ट्य होते. मात्र, महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यात आल्यानंतर ही कामे रखडली होती. त्यामुळे याला विलंब झाला. मात्र, आता ते नागरिकांसाठी खुले होत असल्याचे पाहून मला आनंद होतो, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

11 महिन्यांत 15,000 हेक्टरपेक्षा जास्त जमीनीला वन कायद्याचे अधिकृत संरक्षण देण्याचे सौभाग्य मला मिळाले याचा मला नेहमीच अभिमान आहे. जिल्हाधिकाऱ्यांसह आणि वन विभागाच्या मॅन्ग्रोव्हज सेलसह आमच्या टीमवर्कमुळे हे शक्य झाले, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;