अखेर राज्यपालांना सुप्रीम कोर्टाची ताकद कळली, 2 विधेयकांना मंजुरी दिल्यानंतर CM स्टॅलिन यांचा टोला

अखेर राज्यपालांना सुप्रीम कोर्टाची ताकद कळली, 2 विधेयकांना मंजुरी दिल्यानंतर CM स्टॅलिन यांचा टोला

तमिळनाडूचे राज्यपाल आर. एन. रवी यांनी राज्य सरकारने सादर केलेल्या दोन विधेयकांना अखेर मंजुरी दिली आहे. या विधेयकांमुळे 12,00 हून अधिक दिव्यांग व्यक्तींना स्थानिक आणि शहरी स्वराज्य संस्थांमध्ये प्रतिनिधित्वाचा अधिकार मिळणार आहे. ही विधेयके बराच काळ राजभवनात प्रलंबित होती. सुप्रीम कोर्टाने राज्यपालांचा विधेयके रोखण्याचा निर्णय बेकायदेशीर ठरवल्याने हा निर्णय घेण्यात आला.

मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी विधेयकांना मंजुरी दिल्याच्या निर्णयाचे स्वागत केले असून राज्यपालांनी सुप्रीम कोर्टाच्या दबावामुळे हा निर्णय घेतल्याचा टोला लगावला. सोशल मीडियावर एक पोस्ट करत स्टॅलिन म्हणाले आहेत की, राज्यपालांना अखेर सुप्रीम कोर्टाची शक्ती कळली. जर त्यांनी त्यांचे संवैधानिक कर्तव्य आधीच पार पाडले असते तर ही परिस्थिती उद्भवली नसती. राज्यपालांचे हे वर्तन तामिळनाडूच्या लोकांच्या हिताच्या विरुद्ध आहे आणि त्यामुळे सरकारच्या विकासकामांना विलंब होत आहे, असा दावाही त्यांनी केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;