Jalana News- शेततळ्यात बुडून सख्ख्या बहीण भावासह तिघांचा मृत्यू

Jalana News- शेततळ्यात बुडून सख्ख्या बहीण भावासह तिघांचा मृत्यू

जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील वरुड येथे शेततळ्यात बुडून तीन चिमुकल्यांचा मृत्यू झाला. सक्खे भाऊ-बहिण आणि चुलत भाऊ असे या घटनेत मृत्यूमुखी पडले आहेत.

जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील वरुड येथील तीन चिमुकली मुले सोमवारी गायब झाली होती. दरम्यान आज 3 जून मंगळवारी सकाळी कोनड रोडवरील त्यांच्या शेतालगत असलेल्या शेततळ्यात आढळून आले. वरुड येथील कोनड रोडवर रहिवासी असलेल्या जोशी कुटुंबीयातील यश अनिल जोशी (14) दिपाली रमण जोशी (9) रोहन रमण जोशी (7 ) यांचा मृततात समावेश आहे.

तिन्ही मुले सोमवारी सकाळी 10 30 वाजता महादेव मंदिर डोलखेडा रोड या ठिकाणी दर्शनासाठी जातो असे सांगून घरातून गेले होते दरम्यान शेतातील घराजवळ असलेल्या एका शेततळ्यात पोहण्यासाठी ते गेले असावेत. मंगळवारी सकाळी त्यांचा मृतदेह पाण्यात तरंगताना दिसून आला. पाण्यात बुडून तिघांचाही मृत्यू झाला. चिमुकल्या लहान मुलांच्या पाण्यात बुडून झालेल्या मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.

यातील यश अनिल जोशी हा मुलगा खामगाव येथे शिक्षणासाठी असतो दरम्यान उन्हाळ्यात सुट्टी असल्याने तो वरुड येथे आला होता. येत्या दहा तारखेला तो परत शाळेसाठी खामगाव येथे जाणार होता परंतु त्या अगोदरच त्याच्यावर काळाने घाला घातला. या घटनेमुळे जिल्हाभरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Tragic Drowning in Farm Pond: Siblings Among Three Dead in Maharashtra

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;