Skin Care- त्वचा उजळण्यासाठी मोहरीचे तेल आहे गुणकारी, वाचा सविस्तर

Skin Care- त्वचा उजळण्यासाठी मोहरीचे तेल आहे गुणकारी, वाचा सविस्तर

आपल्या खाद्यसंस्कृतीत मोहरीचे तेल हे खासकरुन काही प्रांतामध्ये वापरले जाते. आपल्या खाद्यसंस्कृती आरोग्यदायी असल्याने मोहरीचे तेल आरोग्यदायी आहे. पण त्याचबरोबर सौंदर्यवर्धक सुद्धा  आहे. या तेलातील पोषक तत्त्वामुळे त्वचा, शरीराचे पोषण होते. त्याचबरोबर त्वचा, केसांसंबंधीच्या समस्याही दूर होण्यास मदत होते. मोहरीचे तेल हे त्वचेसाठी खूप महत्त्वाचे मानले जाते.
 
जाणून घेऊया मोहरीच्या तेलाचे सौंदर्यवर्धक फायदे

त्वचा उजळण्यासाठी आवश्यक असे अनेक गुणधर्म मोहरीच्या तेलात असतात. त्यामुळे त्वचेला कोणतेही हानी होत नाही. खोबरेल तेलात मोहरीचे तेल मिसळून चेहऱ्यावर लावा. त्यामुळे रक्तप्रवाह सुधारेल आणि त्वचाही उजळेल.

 

केस रुक्ष होणे, खाज, कोंडा यांसारख्या केसांच्या समस्येवर मोहरीचे तेल गुणकारी ठरते. आठवड्यातून एकदा मोहरीचे तेल कोमट करुन त्याने केसांना मसाज करा आणि त्यानंतर अर्ध्या तासाने केस सौम्य शॅम्पूने धुवा. केसांच्या समस्या दूर होण्यास मदत होईल व केस चमकदार होतील.

मोहरीच्या तेलाने रॅशेस पासून सुटका होते. यात अंटी फंगल आणि अंटी बॅक्टेरिअल गुणधर्म असतात. त्यामुळे त्वचेवर होणारे रॅशेस दूर होतात. यासाठी मोहरीच्या तेलात खोबरेल तेल मिसळून त्वचेवर मसाज करावा. अतिशय उपयुक्त आणि गुणकारी असा हा तोडगा आहे.

उन्हापासून संरक्षण करण्यासाठी आपण नानाविध क्रिमचा वापर करतो. पण अनेकांना हे ठाऊक नाही की, सनबर्न या समस्येपासून वाचण्यासाठी मोहरीच्या तेलाशिवाय दुसरा परिणामकारक उपाय नाही. मोहरीच्या तेलात व्हिटॅमिन ई असल्याने सूर्याच्या हानिकारक किरणांपासून त्वचेचे संरक्षण होते तसेच त्वचेवरील सुरकुत्यांवर परिणामकारक ठरते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;