IPL 2025 Final – अठरा वर्षांची ‘विराट’ प्रतिक्षा संपली, पंजाबचा पराभव करत RCB आयपीएलची नवीन चॅम्पियन

IPL 2025 Final – अठरा वर्षांची ‘विराट’ प्रतिक्षा संपली, पंजाबचा पराभव करत RCB आयपीएलची नवीन चॅम्पियन

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडलेल्या IPL 2025 च्या फायनलमध्ये. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पंजाब किंग्जचा 06 धावांनी पराभव करत पहिल्यावहिल्या आयपीएलच्या विजेतेपदाला गवसणी घातली आहे. या विजयासह आयपीएलला नवीन विजेता मिळाला आहे. बंगळुरूने प्रथम फलंदाजी करताना पंजाबला 190 धावा करत 191 धावांचे माफक आव्हान दिले होते. परंतु आव्हानाचा पाठलाग करताना बंगळुरुच्या गोलंदाजांनी अचूक मारा करत पंजाबच्या फलंदाजांच्या पायात बेड्या घातल्या. एक मागोमाग एक विकेट पडत गेल्याने संघ अडचणीत सापडला. जोश इंग्लिसने 23 चेंडूंमध्ये 4 षटकार आणि एक चौकार मारत 39 धावांची खेळी करत सामन्यात रंगत आणली. मात्र कृणाल पंड्याने त्याला आपल्या फिरकीच्या जाळ्यात फसवलं आणि सामना RCB च्या बाजून झुकला. त्यानंतर शशांक सिंगने (30 चेंडू 61 धावा) पंजाबला चॅम्पियन बनवण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केला. परंतु इतर फलंदाजांची साथ न मिळाल्यामुळे संघाचा पराभव झाला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;