Jaggery Benefits- दररोज गूळ खाण्याचे 9 आरोग्य फायदे, वाचा सविस्तर

Jaggery Benefits- दररोज गूळ खाण्याचे 9 आरोग्य फायदे, वाचा सविस्तर

आपल्याला अनेकदा गोड खाण्याची इच्छा होते. अशावेळी घरातील साखरेपेक्षा गूळ खाणं हे केव्हाही बेस्ट. गूळ केवळ जिभेचे चोचले पुरवण्यासाठी नाही तर, आरोग्याचाही खजिना आहे. गूळ हा आपल्या शरीरासाठी अमृतासारखे काम करतो. गूळ खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे, चला तर जाणून घेऊया गूळ खाण्याचे फायदे

गूळ खाण्याचे 9 आश्चर्यकारक फायदे

1- वजन कमी करण्यास मदत करते
तुम्हालाही वजन कमी करायचे असेल तर, जेवणानंतर गूळ खा. गुळामध्ये असलेले फायबर वजन कमी करण्यास मदत करू शकते. त्यामध्ये असलेले पोटॅशियम, कॅल्शियम, तांबे आणि जस्त सारखे पोषक घटक शरीरासाठी आवश्यक असतात. गूळ खाल्ल्याने चयापचय वाढतो आणि पचन सुधारते, यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

2- त्वरित ऊर्जा देते
थकवा किंवा अशक्तपणा जाणवत असेल तर गूळ फायदेशीर ठरू शकतो. गूळामध्ये कार्बोहायड्रेट्स भरपूर प्रमाणात असतात, यामुळे शरीरातील उर्जेची पातळी वाढते.

3- रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी
चांगली प्रतिकारशक्ती संसर्गापासून वाचवण्यास मदत करते. गुळामध्ये व्हिटॅमिन सी, बी६, झिंक आणि सेलेनियम सारखे रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे सूक्ष्म पोषक घटक असतात. एवढेच नाही तर ते अँटिऑक्सिडंट गुणधर्मांनी समृद्ध आहे, म्हणूनच ते रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे म्हणून देखील काम करतात.

4- त्वचेची काळजी घेण्यासाठी
त्वचेच्या आरोग्यासाठीही गूळ खूप फायदेशीर आहे. गूळ रक्तातील हानिकारक विषारी पदार्थ काढून टाकतो आणि रक्ताभिसरण सुधारून त्वचा स्वच्छ ठेवण्यास मदत करतो.

5- मूड चांगला ठेवण्यासाठी
गूळ हा एक उत्तम मूड बूस्टर आहे जो मूड आनंदी ठेवण्यास मदत करतो. जर तुम्ही प्रक्रिया केलेल्या साखरेऐवजी नैसर्गिक गोडवा देणारा गूळ खाल्ला तर आश्चर्यकारक फायदे मिळू शकतात.

6- गॅसच्या समस्येत फायदेशीर
गॅसची समस्या असेल तर, दररोज एक ग्लास पाणी किंवा दुधासोबत गूळ घेतल्याने पोटात गॅस तयार होण्यास प्रतिबंध होतो.

7- अशक्तपणाचा धोका कमी करते
अशक्तपणामध्ये हिमोग्लोबिनची पातळी लक्षणीयरीत्या कमी होते. त्यामुळे शरीरात लोहाची कमतरता निर्माण होते. गुळामध्ये भरपूर लोह असते, जे शरीरातील लोहाची कमतरता पूर्ण करण्यास मदत करते. त्यामुळे अशक्तपणाच्या रुग्णांसाठीही गूळ खूप फायदेशीर आहे.

8- सर्दी- खोकल्यामध्ये फायदेशीर
गुळाला अमृत समतुल्य मानले जाते. त्याचा स्वभाव उष्ण आहे, त्यामुळे सर्दी, खोकला आणि कफ यासारख्या समस्यांपासून आराम मिळण्यास मदत होते.

9- रक्तदाब नियंत्रणात ठेवते
सकाळी रिकाम्या पोटी गूळ खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते. गुळामध्ये पोटॅशियम आणि सोडियम आढळते जे शरीरातील आम्ल पातळी कमी करते आणि लाल रक्तपेशी निरोगी बनवते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

श्री विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी टोकन पद्धत श्री विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी टोकन पद्धत
श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना जलद दर्शन मिळावे म्हणून मंदिर समितीने टोकन दर्शनाची रंगीत तालीम घ्यायला सुरुवात केली आहे....
शैक्षणिक संस्थेत प्रवेशाच्या आमिषाने फसवणारा गजाआड
पक्षात कोणीही नाराज नाही, शिवसेना संपविण्याची भाषा सहन केली जाणार नाही! कोअर कमिटीचा इशारा
बंगळुरूत विजयाचा जल्लोष क्रिकेटप्रेमींच्या जिवावर, चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू; 33 जखमी
राजकीय ‘लाभ’ डोळ्यापुढे ठेवून निवाडा करणे नैतिक चिंतेची बाब, सरन्यायाधीश भूषण गवई यांचे मत
धारावीकरांवर अन्याय होऊ देणार नाही, मुंबईभर आंदोलन करू, उद्धव ठाकरे यांची रहिवाशांना ग्वाही
फडणवीसांच्या मंत्रिमंडळात गिरीश महाजन सर्वात भ्रष्ट, ठेकेदार अभिषेक कौल महाजनांचा दलाल; संजय राऊत यांचा घणाघात