IPL 2025 Final – रोहित आणि धोनीसह इतर कर्णधारांना जे जमलं नाही ते श्रेयस अय्यर करुन दाखवणार?
IPL 2025 ची फायनल पंजाब किंग्ज (PBKS) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. संध्याकाळी 7.30 वाजता फायनलचा थरार सुरू होणार आहे. या हंगामात आयपीएलला नवा चॅम्पियन मिळणार आहे. पंजाब किंग्ज आणि बंगळुरू आतापर्यंत एकदाही विजेतेपद पटकावू शकलेले नाहीत. त्यामुळे दोन्ही संघ पहिल्यावहिल्या विजेतेपदासाठी मैदानात उतरली. हा सामना पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरसाठी ऐतिहासिक ठरणार आहे.
श्रेयस अय्यरने आयपीएलच्या 18व्या हंगामात आतापर्यंत धमाकेदार कामगिरी केली आहे. कर्णधारपदाची जबाबदारी पार पाडताना दमदार फलंदाजीही त्याने केली आहे. क्वालिफायर 2 मध्ये पाच वेळच्या चॅम्पियन मुंबई इंडियन्सविरुद्ध त्याने पंजाबला एकहाती सामना जिंकून दिला. मागच्या वर्षी कोलकाता नाईट रायडर्सचे नेतृत्व करताना KKR ने आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते. यावर्षी पंजाबचे नेतृत्व करताना श्रेयसला पुन्हा एकदा विजेतेपद पटकावण्याची सुवर्णसंधी आहे. जर पंजाबने बंगळुरूचा पराभव करत विजेतेपद पटकावले तर, श्रेयस अय्यर आयपीएलच्या इतिहासातील दोन वेगवेगळ्या संघांकडून विजेतेपद पटकावणारा पहिला कर्णधार ठरणार आहे. आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून महेंद्र सिंग धोनी आणि रोहित शर्मा यांच्या नावाच उल्लेख केला जातो. धोनीने चेन्नईचे नेतृत्व करताना 5 ट्रॉफ्या आणि रोहितने मुंबईचे नेतृत्व करताना 5 ट्रॉफ्या उंचावल्या आहेत. परंतु श्रेयस अय्यरचा विक्रम यांच्यापेक्षाही वेगळा ठरणार आहे.
रोहित शर्मा आणि महेंद्र सिंग धोनी हे दोघेही सलग दोन हंगामात विजेतेपद पटकावणारे कर्णधार आहेत. रोहितने 2019 आणि 2020 साली मुंबईचा कर्णधार असताना विजेतेपद पटकावले होते. तर धोनीने 2010 आणि 2011 साली चेन्नईचा कर्णधार असताना विजेतेपद पटकावले होते. आता श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात पंजाबने जर ट्रॉफी उंचावली तर, तो सलग दोन हंगामात आयपीएलचे विजेतेपद पटकावणारा श्रेयस तिसरा कर्णधार ठरणार आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List