जगाला सांगत आहेत पण संसदेत नाही, ऑपरेशन सिंदूरवर विशेष अधिवेशन बोलवा; 16 पक्षांचे पंतप्रधान मोदींना पत्र

जगाला सांगत आहेत पण संसदेत नाही, ऑपरेशन सिंदूरवर विशेष अधिवेशन बोलवा; 16 पक्षांचे पंतप्रधान मोदींना पत्र

ऑपरेशन सिंदूर प्रकरणी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवावे अशी मागणी विरोधी पक्षाने केली आहे. मंगळवारी दिल्लीच्या कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये इंडिया आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीला जयरामर रमेश, संजय राऊत, राम गोपाल यादव मनोज झा आणि डेरेक ओब्रयन उपस्थित होते.

दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर 16 विरोधी पक्षांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिले आहे. ऑपरेशन सिंदूरप्रकरणी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवावे अशी मागणी या पत्रातून करण्यात आली आहे. तसेच पहलगाम, पुंछ, उरी आणि राजौरीमध्ये जे हल्ले झाले त्यावर आणि हिंदुस्थान आणि पाकिस्तान दरम्यान जो संघर्ष झाला त्यावरही चर्चा व्हावी असेही पत्रात म्हटले आहे.

या पत्रात काँग्रेस, समाजवादी पक्ष, तृणमूल काँग्रेस, इंडियन युनियन मुस्लीम लीग, राजद, द्रमुक, शिवसेना (उद्धव बाळसाहेब ठाकरे), राजद, नॅशनल कॉन्फ्रन्स, माकप, कम्युनिस्ट पक्ष, रासप, झारखंड मुक्ती मोर्चा, व्हिसीके, केरळ काँग्रेस, एमडीएमक आणि भाकप या पक्षाच्या नेत्यांनी सह्या केले्या आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;