बँकॉकहून परतणाऱ्या प्रवाशाच्या बॅगेतून निघाले 48 साप, कस्टम अधिकाऱ्यांकडून अटक

बँकॉकहून परतणाऱ्या प्रवाशाच्या बॅगेतून निघाले 48 साप, कस्टम अधिकाऱ्यांकडून अटक

मुंबई विमानतळावर एका प्रवाशाकडे 48 विषारी साप आणि इतर प्राणी सापडले आहेत. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. बँकॉकहून परतणाऱ्या या प्रवाशाकडून हे प्राणी सापडले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार मुंबईत विमानतळावर एक प्रवासी बँकॉकहून परतला होता. या प्रवाशाक़डे पाहून कस्टमच्या एका अधिकाऱ्याला संशय आला. तेव्हा अधिकाऱ्यांनी या प्रवाशाची बॅग तपासली. बॅग उघडल्यानंतर अधिकारी चकितच झाले. कारण या बॅगेत कपडे नव्हे तर प्राणी होते. त्यात साप, कासव आणि काही सरडे होते. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

आरोपीच्या बॅगेत सर्वात विषारी समजले जाणारे व्हायपर प्रजातीचे 46 साप, एशियन कासवं सापडले आहेत. त्यात दोन सापांना कोळी सारखी शेपटी आहे. या प्राण्यांची तस्करी केल्या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;