G -7 परिषेदत हिंदुस्थानला का बोलावले नाही? याचे उत्तर विश्वगुरुंनी द्यावे, संजय राऊत यांचे आव्हान

G -7 परिषेदत हिंदुस्थानला का बोलावले नाही? याचे उत्तर विश्वगुरुंनी द्यावे, संजय राऊत यांचे आव्हान

पहलगाम हल्ल्यानंतर एकही देश हिंदुस्थानच्या बाजूने उभा राहिला नाही, हे मोदी सरकारच्या परदेश धोरणाचे अपयश आहे, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले. देशाची बाजू मांडण्यासाठी यांना शिष्टमंडळ पाठवावे लागले, मात्र, त्यातून नेमके काय साध्य झाले? असा सवालही त्यांनी केला. मोदी यांनी 200 देशांचा दौरा केला, ते 200 देश फिरले पण त्यांना एकही मित्र देश जोडता आला नाही, असा हल्लाही संजय राऊत यांनी चढवला.

हिंदुस्थानची अवस्था जगामध्ये अत्यंत बिकट झाली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर हिंदुस्थानच्या बाजून एकही मित्र उभा ठाकला नाही. सद्यस्थितीत हिंदुस्थानसारख्या मोठ्या देशाला जगात एकही मित्र नाही. मोदी 200 देश फिरून आले पण त्यांना एकही मित्र जोडता आला नाही. देशात आणि पक्षातही त्यांना कोणी मित्र नाही. देशाची बाजू मांडण्यासाठी त्यांना शिष्टमंडळ पाठवावे लागत आहे. पण त्याने काय साध्य झाले हा महत्त्वाचा प्रश्न आहे. राष्ट्रीय मुद्दा असल्याने यावर फारसे बोलणे योग्य नाही. ते कशासाठी गेले आणि काय करत आहेत. ते अशा देशात गेले आहेत, ज्यांचा या संघर्षाशी काहीही संबंध नाही. मात्र, विश्वगुरुंनी पाठवले आहे, म्हणून शिष्टमंडळ गेले, एवढेच त्याला महत्त्व आहे, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

या कठीण प्रसंगात हिंदुस्थानसोबत एकही राष्ट्र उभे राहण्यास तयार नाही, याचे कारण म्हणजे नरेंद्र मोदी आणि त्यांचे सरकार आहे. नेपाळसारखा लहान देशही आपल्या बाजूने नाही, हे विदेश नीतीचे अपयश आहे. नरेंद्र मोदी यांची बिघडलेली प्रतीमा आणि त्यांची अयोग्य धोरणेच यासाठी कारणीभूत आहेत.जी -7 परिषेदेत हिंदुस्थानला का बोलवण्यात आले नाही, हा सवाल विश्वगुरुंना विचारणे गरजेचे आहे. हिंदुस्थानला बोलवण्यात आले नाही, हा आपल्या देशाचा अपमान आहे, याबाबत विश्वगुरु,परदेशमंत्री यांनी उत्तर देणे गरजेचे आहे, असेही संजय राऊत म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;