कोरोनामुळे राज्यात आणखी दोन रुग्णांचा मृत्यू, लक्षणं सौम्य असल्याची डॉक्टरांची माहिती

कोरोनामुळे राज्यात आणखी दोन रुग्णांचा मृत्यू, लक्षणं सौम्य असल्याची डॉक्टरांची माहिती

कोरोनामुळे राज्यात दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एक रुग्ण कोल्हापूरचा असून दुसरा रुग्ण साताऱ्याचा आहे. त्यामुळे राज्यात कोरोनामुळे मृत पावलेल्या रुग्णांची संख्या 10 वर पोहोचली आहे. मुंबईत सध्या कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 483 वर पोहोचली आहे. असे असले तरी सक्रिय रुग्णांमध्ये ज्यात वृद्ध रुग्णांनाही कोरानाची सौम्य लक्षणं आहेत. जे रुग्ण मृत पावले आहेत ते रुग्ण वृद्ध असून त्यांना आधीच गंभीर आजार होते.

मुंबईत एका रुग्णालयात 87 वर्षाच्या वृद्ध महिलेला कोरोनाची लागण झाली आहे.
त्यांना आधीपासून मधुमेहाचा त्रास होता. तसेच किडनीचा आजार आणि टीबीही झाला होता. त्यांना श्वास घ्यायला त्रास झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि त्यात त्यांची कोरोना चाचणीही पॉझिटिव्ह आली होती. हळूहळू त्यांची तब्येत सुधारत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. शनिवारी केलेल्या चाचणी त्यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

सध्याच्या काळात ज्यांना कोरोनाची लागण होत आहे त्यांना रुग्णालयात दाखल केलेच पाहिजे असे काही. असे असले तरी आम्ही मास्क लावण्यासारखी काळजी घेत आहोत असेही डॉक्टरांनी म्हटले आहे.

मे मध्ये कोरोनामुळे ८ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात अनेकांना मधुमेह, स्ट्रोक, कॅन्सर आणि फुफ्फुसांचा आजार होता. तसेच ज्यांना HIV झाला आहे आणि ज्या महिला गरोदर आहेत ते रुग्णही कोरोनातून बरे होत असल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे. केईएम रुग्णालयात एकही कोरोनाचा रुग्ण नसल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे. तसेच लीलावती रुग्णालयातही रुग्णांनी विनंती केल्यानंतर दाखल केले जात असल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;