कॅनरा बँकेतून 59 किलो सोने आणि रोख रकमेची चोरी, गुन्हा करण्यासाठी काळ्या जादूचा वापर?

कॅनरा बँकेतून 59 किलो सोने आणि रोख रकमेची चोरी, गुन्हा करण्यासाठी काळ्या जादूचा वापर?

कर्नाटकातील विजयपुरा जिल्ह्यात कॅनरा बँकेत नाट्यमय दरोड्याची घटना उघडकीस आली आहे. विजयपुरा जिल्ह्यातील मंगुली येथील कॅनरा बँकेच्या शाखेत 23 मे रोजीही चोरी झाली. चोरट्यांनी 59 किलो सोने आणि 5.2 लाख रुपये रोख रक्कम चोरून नेली. बँक कर्मचारी कामावर परतल्यानंतर 26 मे रोजी ही घटना उघडकीस आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी 26 मे रोजी सफाई कर्मचारी कामावर आले तेव्हा शटरचे कुलूप तुटलेले दिसले. यानंतर ही दरोड्याची घटना उघड झाली. बँक मॅनेजरने पोलिसात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा सुरू केला.

विजयपुराचे एसपी लक्ष्मण निंबर्गी यांनी दिलेल्या माहितीनुसार, 23 मे रोजी सायंकाळी 6 ते 25 मे रोजी सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास ही चोरी झाल्याचा संशय आहे. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी आठ पथके तयार केली आहेत. या चोरीत 6 ते 8 आरोपींचा सहभाग होता, असेही निंबर्गी यांनी नमूद केले. ही चोरी पूर्वनियोजित होती. चोरी करण्यासाठी चोरांनी वीकेंडची वाट पाहिली. कारण चोरीच्या दिवशी दुसरा शनिवार आणि रविवार होता.

बनावट चावीचा वापर करत चोरट्यांनी बँकेत प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी बँकेतील अलार्म बंद सीसीटीव्ही कॅमेरे बंद केले. तसेच त्यांनी नेटवर्क व्हिडिओ रेकॉर्डर (एनव्हीआर) देखील काढून घेतला. यानंतर चोरट्यांनी बँक लॉकर उघडले आणि सोने घेऊन पळून गेले. मौल्यवान वस्तू असलेले दुसरे लॉकर अबाधित राहिले, यावरून असे दिसून येते की गुन्हेगारांना बँकेच्या अंतर्गत व्यवस्थेची पूर्व माहिती होती, असे एसपी म्हणाले.

चोरी केल्यानंतर चोरट्यांनी तुटलेल्या खिडकीजवळ एक काळी बाहुली ठेवली. यावरून बँक लुटण्यासाठी काळ्या जादूचा वापर केल्याचा म्हटले जात आहे. मात्र केवळ दिशाभूल करण्यासाठी आणि तपासाला विलंब करण्यासाठी जाणीवपूर्वक चोरट्यांनी हे कृत्य केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. दरम्यान, पोलीस सर्व बाजूंनी घटनेचा तपास करत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;