Latur News – शेतजमिनीची मोजणी करताना दोन गटात हाणामारी, दहा जणांवर गुन्हा दाखल

Latur News – शेतजमिनीची मोजणी करताना दोन गटात हाणामारी, दहा जणांवर गुन्हा दाखल

शेतजमिनीची मोजणी सुरु असताना दोन गटातील वाद विकोपाला गेल्याने हाणामारी झाली. अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथे ही घटना घडली. याप्रकरणी दोन गटातील एकूण दहा जणांविरोधात अहमदपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथील शेतकरी गजानन बालाजी दमकोंडवार आणि गोविंद रामकिशन गुरमे यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून शेतजमिनीचा वाद होता. हा वाद मिटवण्यासाठी शेतजमीन मोजून सीमा निश्चित करण्यासाठी भूमी अभिलेख अधिकारी आले होते. यावेळी दोन्ही गटात जमिनीच्या हद्दीवरून वाद झाला. हा वाद विकोपाला जाऊन दोन्ही गटांनी एकमेकांना दगड आणि काठीने बेदम मारहाण केली.

यानंतर दोन्ही गटाकडून अहमदपूर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक स्मिता जाधव करीत आहेत. गोविंद रामकिशन गुरमे, दत्ता रामकिशन गुरमे, शुभम गोविंद गुरमे, शिवचंद्र गुरमे, उमाकांत रघुवीर गुरमे, विठ्ठल शिवचंद्र गुरमे, बालाजी दमकोंडवार, गजानन बालाजी दमकोंडवार, दयानंद बालाजी दमकोंडवार अशी गुन्हा दाखल केलेल्या आरोपींची नावे आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;