क्या हुआ तेरा वादा? शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शिवसेना आक्रमक, 5 जूनपासून मराठवाड्यात जन आंदोलन

क्या हुआ तेरा वादा? शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शिवसेना आक्रमक, 5 जूनपासून मराठवाड्यात जन आंदोलन

सत्तेत येण्यापूर्वी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने शेतकऱ्यांना अनेक प्रलोभने दाखवत घोषणांचा पाऊस पाडला होता. मात्र सत्तेत आल्यावर सरकारला शेतकऱ्यांचा विसर पडला आहे. त्यामुळे सरकार ला शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर जाब विचारण्यासाठी मराठवाड्यात शेतकऱ्यांचे जनआंदोलन उभारण्यात येणार आहे.

5 जून ते 12 जून या कालावधीत हे आंदोलन उभारले जाणार असून सरकारला क्या हुआ तेरा वादा? या शिषर्काखाली जाब विचारून आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाची रूपरेषा ठरविण्यासाठी आज शिवसेना भवन, मुंबई येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली मराठवाड्यातील उपनेते, जिल्हाप्रमुख आदींची बैठक पार पडली. या बैठकीला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ज्येष्ठ नेते विश्वनाथ नेरुरकर, चंद्रकांत खैरे, संपर्कप्रमुख व उपनेते विनोद घोसाळकर, नेते अंबादास दानवे, आमदार कैलास पाटील यांनी मार्गदर्शन केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;