Chatting Apps ला टक्कर; एलन मस्क आणणार X Chat फिचर, मोबाईल नंबरचीही आवश्यकता नाही!
व्हॉट्सअॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून एकमेकांशी चॅट करणे, कॉलवर बोलणे सहज सोपे झाले आहे. दरम्यान, या चॅटिंगच्या युगात आता आणखी एका चॅटींग फिचरची एन्ट्री झाली आहे. XChat असे या त्याचे नाव आहे. X Chat ला टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांनी लॉन्च केले आहे. यामध्ये वापरकर्त्यांच्या सवलतीनुसार खास फिचर्स देण्यात आले आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे X Chat साठी मोबाईल नंबरची आवश्यकता नसेल.
टेस्लाचे सीईओ Elon Musk ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर यासंदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी एक्सचॅट लाँच केल्याची माहिती दिली आहे. या पोस्टमध्ये मस्क यांनी मेसेजिंग फीचरबद्दलही सांगितले आहे. X Chat ला X प्लॅटफॉर्म म्हणजेच पूर्वीच्या ट्वीटरसोबत जोडण्यात येणार आहे. एलन मस्क बऱ्याच दिवसांपासून एक मोठी योजना आखत आहेत. त्यांना X प्लॅटफॉर्मला Everything App मध्ये बदलायचे आहे. म्हणजे त्यांना X ला चीनच्या WeChat सारखे बनवायचे आहे. चीनमध्ये WeChat अॅपद्वारे अनेक प्रकारच्या सुविधा पुरवल्या जातात. यामध्ये मेसेजिंग, पेमेंट, मीडिया आणि डेटिंग यांचा समावेश आहे.
All new XChat is rolling out with encryption, vanishing messages and the ability to send any kind of file. Also, audio/video calling.
This is built on Rust with (Bitcoin style) encryption, whole new architecture.
— Elon Musk (@elonmusk) June 1, 2025
एक्सचॅटवर मोबाईल नंबर लिंक करण्याची गरज नाही
XChat वापरण्यासाठी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर लिंक करण्याची आवश्यकता नाही. त्याशिवाय तुम्ही मेसेजिंग, ऑडिओ, व्हिडिओ आणि फाइल शेअरिंग या फीचरचा वापर करू शकता. सध्या XChat ची चाचणी केली जात आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत ते युजर्सना वापरण्यासाठी जारी केले जाईल.
X Chat ची मुख्य वैशिष्ट्ये
एलन मस्क यांनी स्वतः XChat च्या वैशिष्ट्यांबद्दल माहिती शेअर केली आहे.
1. End-to-End Encryption : या फिचरसाठी गोपनियतेवर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामपळे हॅकर्स तुमचे पर्सनल चॅट हॅक करू शकत नाहीत.
2. Disappearing मेसेजेस : जर मेसेज पाठवणाऱ्या वापरकर्त्यांना त्यांची गोपनियता राखायची असेल तर व्हॉट्सअॅप चॅटप्रमाणे ते Disappearing मेसेजेसचा पर्याय निवडू शकतात. यानंतर, ठराविक वेळेनंतर मेसेज आपोआप डिलिट होतील.
3. ऑडिओ आणि व्हिडिओ कॉल सुविधा : एक्सचॅटच्या मदतीने वापरकर्त्यांना ऑडिओ आणि व्हिडिओ कॉलची सुविधा मिळणार आहे. यासाठी कोणताही नंबर वापरण्याची आवश्यकता नाही.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List