युक्रेनचा रशियावर पुन्हा हल्ला, 1100 किलो स्फोटकांनी क्रिमियन पूल उडवला

युक्रेनचा रशियावर पुन्हा हल्ला, 1100 किलो स्फोटकांनी क्रिमियन पूल उडवला

युक्रेनने मंगळवारी पुन्हा एकदा रशियावर हल्ला केला आहे. युक्रेनच्या सुरक्षा सेवेने (SBU) रशियाचा क्रिमियन पूल स्फोटकांनी उडवला. या हल्ल्यात 1100 किलो टीएनटी स्फोटके वापरण्यात आली होती. या स्फोटात पुलाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचा दावा करण्यात येत आहे. रशियाने अद्याप या स्फोटावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

स्थानिक वेळेनुसार पहाटे 4.44 वाजता हा स्फोट झाला. पाण्याखाली स्फोटके पेरून हा पूल कमकुवत करण्याचा प्रयत्न करण्यात आला. क्रिमियन पूल रशिया आणि क्रिमियाला जोडणारा एक महत्त्वाचा पूल आहे. रशियाने क्रिमिया ताब्यात घेतल्यानंतर 2014 मध्ये हा पूल बांधण्यात आला होता. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचा हा एक महत्त्वाचा प्रकल्प मानला जातो.

यापूर्वी 8 ऑक्टोबर 2022 रोजी या पुलावर एका ट्रकचा स्फोट झाला होता, ज्यामुळे मोठी आग लागली होती. त्यानंतर जुलै 2023 मध्ये आणखी एक हल्ला झाला होता ज्यामध्ये दोन पुलांचे काही भाग उद्ध्वस्त झाले होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;