Pune News – शेतात काम करत असताना बिबट्याचा हल्ला, महिला जखमी

Pune News – शेतात काम करत असताना बिबट्याचा हल्ला, महिला जखमी

शेतात खुरपणी करत असताना आंबेगाव येथील लांडेवाडी-चिंचोडी येथे एका महिलेवर बिबट्याने हल्ला केला. मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास ही घटना घडली. या हल्ल्यात महिला जखमी झाली आहे. वनविभागाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत महिलेला मंचर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. महिलेची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी विकास भोसले यांनी दिली.

लांडेवाडी चिंचोली येथील बोंबले वस्ती येथे शेतात खुरपणीचे काम करत असणाऱ्या कमल प्रकाश बोंबले (40) यांच्यावर बिबट्याने हल्ला केला. उसाच्या शेतातून बिबट्याने अचानक येऊन त्यांच्यावर हल्ला केला. मात्र त्यांनी सावध होऊन हल्ला परतवण्याचा प्रयत्न केला. या घटनेत त्यांच्या हातावर बिबट्याचे दोन दात लागल्याने त्या जखमी झाल्या आहेत.

या घटनेची माहिती मिळताच मंचर वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी विकास भोसले यांनी तात्काळ वनरक्षक शिवाजी ढोले, वनरक्षक पी, एम. कांबळे यांना घटनास्थळी पाठवले कमल बोंबले यांना मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;