निवडणूक जाहिरातीतील चेहरा OBC शिष्यवृत्तीपासून वंचित, महायुती सरकारची फसवेगिरी पुन्हा उघड

निवडणूक जाहिरातीतील चेहरा OBC शिष्यवृत्तीपासून वंचित, महायुती सरकारची फसवेगिरी पुन्हा उघड

चंद्रपूरचा रोहित दिवसे हा विद्यार्थी गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीदरम्यान महायुती सरकारच्या जाहिरातीत ‘परदेशी शिक्षणाचे स्वप्न साकारणारा’ चेहरा म्हणून झळकला. मात्र, आता त्याच रोहितला परदेशी शिक्षणासाठी मिळणारी ओबीसी शिष्यवृत्ती मिळण्यास अपात्र ठरविण्यात आले आहे. यातच पुन्हा एकदा महायुती सरकारची फसवेगिरी समोर आली आहे. याबाबत ‘लोकसत्ता’ने वृत्त दिलं आहे.

राज्यातील ओबीसी आणि विमुक्त भटक्या जमाती प्रवर्गातील हुशार विद्यार्थ्यांना 2018-19 पासून परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. याच योजनेंतर्गत रोहितने इंग्लंडमधील बर्मिंगहॅम विद्यापीठात एम.एस्सी. अॅडव्हान्स इंजिनीअरिंग मॅनेजमेंट या एकवर्षीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. त्याच्या कागदपत्रांची तपासणी करून 26 सप्टेंबर 2024 रोजीच्या 75 पात्र विद्यार्थ्यांच्या यादीत त्याचे नाव 24व्या स्थानावर समाविष्ट झाले. या यादीच्या आधारे त्याने 50 लाखांचे कर्ज काढून प्रदेशात शिक्षण सुरू केले. निवडणूक प्रचारादरम्यान सरकारने रोहितच्या यशाची मुलाखत समाजमाध्यमांवर प्रसिद्ध करून स्वतःचे कौतुक करून घेतले.

मात्र आता ओबीसी विभागाने 2024-25 च्या यादीत बदल करत रोहितला जानेवारी 2025 मध्ये उत्तीर्ण झाल्याने अपात्र ठरवले आहे. यामुळे कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या रोहितपुढे आर्थिक संकट उभे आहे. यादी जाहीर करताना कागदपत्रांची योग्य तपासणी का केली नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;