रेकॉर्डब्रेक! यूपीआयवरून 25 लाख कोटींचा व्यवहार

रेकॉर्डब्रेक! यूपीआयवरून 25 लाख कोटींचा व्यवहार

हिंदुस्थानात आता कोणत्याही खरेदीसाठी कॅशचा वापर न करता डिजिटल पेमेंटवरून अर्थात यूपीआयवरून ट्रान्झॅक्शन केले जात आहे. मे 2025 मध्ये म्हणजेच अवघ्या महिनाभरात 18.68 बिलियन ट्रान्झॅक्शन झाले असून याचे एकूण मूल्य तब्बल 25.14 लाख कोटी रुपये इतके मोठे आहे. 2024-25 मध्ये यूपीआय पेमेंट्सने 83.7 टक्क्यांच्या वाढीची नोंद केली आहे, जी गेल्या वर्षीच्या तुलनेत 4 टक्के जास्त आहे. मे 2025 मध्ये 18.68 बिलियन ट्रान्झॅक्शन झाले असून एप्रिलच्या तुलनेत हे 4 टक्के जास्त आहे.

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) दिलेल्या माहितीनुसार, यूपीआय ट्रान्झॅक्शनमध्ये वार्षिक आधारावर 33 टक्के वाढ झाली आहे. मेमध्ये सरासरी दर दिवशी 602 मिलियन यूपीआय ट्रान्झॅक्शन झाले आहेत. या ट्रान्झॅक्शनचे एकूण मूल्य 81,106 कोटी रुपये आहे. हिंदुस्थानात 2016 मध्ये सुरू झालेल्या यूपीआयने नोटाबंदीनंतर खऱ्या अर्थाने आपले पाय रोवले. देशात यूपीआय आता सर्वात लोकप्रिय डिजिटल पेमेंट बनले आहे. गुगलपे, फोनपे आणि पेटीएमद्वारे लोक सर्रास डिजिटल पेमेंट करत आहेत. केवळ देशात नव्हे, तर जागतिक स्तरावरसुद्धा हे डिजिटल पेमेंट वेगाने पसरत आहे.

आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये यूपीआयच्या वापरामध्ये 83.7 टक्के वाढ नोंदवली गेली आहे, तर गेल्या वर्षी हा आकडा 79.7 टक्के होता. आरबीआयने केलेल्या घोषणेनुसार, पुढील चार वर्षांत यूपीआय जगातील 20 देशांत पोहोचेल. यूपीआय सध्या भूतान, नेपाळ, फ्रान्स, मॉरिशस, सिंगापूर, श्रीलंका आणि यूएईसारख्या देशांत स्वीकारला जात आहे. याचा फायदा भारतीय विद्यार्थ्यांना, पर्यटकांना आणि व्यावसायिकांना मिळत आहे. सरळ, सुरक्षित आणि वेगाने पेमेंट करण्याच्या पद्धतीमुळे डिजिटल व्यवहार यूपीआयवरून केला जात आहे. सामान्य नागरिकांसोबतच व्यापारी आणि सरकारी सेवेसाठी याचा वापर केला जात आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

श्री विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी टोकन पद्धत श्री विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी टोकन पद्धत
श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना जलद दर्शन मिळावे म्हणून मंदिर समितीने टोकन दर्शनाची रंगीत तालीम घ्यायला सुरुवात केली आहे....
शैक्षणिक संस्थेत प्रवेशाच्या आमिषाने फसवणारा गजाआड
पक्षात कोणीही नाराज नाही, शिवसेना संपविण्याची भाषा सहन केली जाणार नाही! कोअर कमिटीचा इशारा
बंगळुरूत विजयाचा जल्लोष क्रिकेटप्रेमींच्या जिवावर, चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू; 33 जखमी
राजकीय ‘लाभ’ डोळ्यापुढे ठेवून निवाडा करणे नैतिक चिंतेची बाब, सरन्यायाधीश भूषण गवई यांचे मत
धारावीकरांवर अन्याय होऊ देणार नाही, मुंबईभर आंदोलन करू, उद्धव ठाकरे यांची रहिवाशांना ग्वाही
फडणवीसांच्या मंत्रिमंडळात गिरीश महाजन सर्वात भ्रष्ट, ठेकेदार अभिषेक कौल महाजनांचा दलाल; संजय राऊत यांचा घणाघात