‘किती विकेट पडल्या हे महत्त्वाचे नाही, विजय महत्त्वाचा’, CDS अनिल चौहान यांनी पाकिस्तानला खडसावले

‘किती विकेट पडल्या हे महत्त्वाचे नाही, विजय महत्त्वाचा’, CDS अनिल चौहान यांनी पाकिस्तानला खडसावले

पुणे विद्यापीठाच्या एका कार्यक्रमात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल अनिल चौहान यांनी ऑपरेशन सिंदूरबद्दल महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही, या कार्यक्रमात बोलताना त्यांनी पाकिस्तानला स्पष्ट उत्तर दिले आहे. सीडीएस जनरल अनिल चौहान म्हणाले की, ऑपरेशन सिंदूरमागील कल्पना पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद थांबवणे होती. ते म्हणाले की, हिंदुस्थान दहशतवादाच्या सावलीत आणि अणु हल्ल्याच्या धोक्यात राहणार नाही.

या कार्यक्रमात त्यांना ऑपरेशन सिंदूर दरम्यान हिंदुस्थानी सशस्त्र दलांना झालेल्या नुकसानाबद्दल विचारले असता, सीडीएस जनरल अनिल चौहान यांनी एका क्रिकेट सामन्याचा संदर्भ देत म्हटले की, “एखादा संघ सामना कसा जिंकतो हे महत्त्वाचे आहे. जेव्हा एखादा संघ जिंकतो तेव्हा कोणीच्या किती विकेट पडल्या, हा प्रश्न उपस्थित करत नाही.” ते म्हणाले की, लष्करी दलांवर नुकसानाचा कोणताही परिणाम होत नाही.

सीडीएस जनरल चौहान म्हणाले, “पाकिस्तानला वाटले होते की, ते हिंदुस्थानविरुद्ध 48 तास युद्ध सुरू ठेवतील, परंतु आठ तासांत त्यांनी शरणागती पत्करली आणि वाटाघाटी करण्याची इच्छा व्यक्त केली. 10 मे च्या रात्री पाकिस्तानला समजले की, जर हिंदुस्थानची कारवाई अशीच सुरू राहिली तर त्यांचे खूप नुकसान होईल. या भीतीमुळे पाकिस्तानने हिंदुस्थानशी चर्चा केली. जेव्हा पाकिस्तानकडून चर्चेसाठी आणि तणाव कमी करण्यासाठी विनंती आली तेव्हा आम्ही ती स्वीकारली.”

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;