नदीकिनारी बनवलेली रील अखेरची ठरली, मग अंघोळीसाठी पाण्यात उतरल्या अन् 6 जणी बुडाल्या

नदीकिनारी बनवलेली रील अखेरची ठरली, मग अंघोळीसाठी पाण्यात उतरल्या अन् 6 जणी बुडाल्या

अंघोळीसाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील सहा मुली यमुना नदीत बुडाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. यापैकी चौघींचा मृत्यू झाला तर दोघींची प्रकृती गंभीर आहे. वाचवण्यात आलेल्या दोन मुलींवर एसएन मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत. उत्तर प्रदेशातील आग्रा येथील स्वामी नगला गावाजवळ ही घटना घडली.

उकाड्याने हैराण झाल्याने सर्व मुली यमुना नदीवर अंघोळीसाठी गेल्या होत्या. अंघोळीला जाण्यापूर्वी सर्व मुलींनी नदीकिनारी रील बनवली. यानंतर सर्वजणी पाण्यात उतरल्या. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने त्या बुडू लागल्या.

ही घटना लक्षात येताच स्थानिकांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. मात्र पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन बचाव कार्य राबवेपर्यंत चौघींचा मृत्यू झाला होता. दोघींची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे मुलींच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;