G-7 शिखर परिषदेसाठी सहा वर्षांत पहिल्यांदाच हिंदुस्थानला निमंत्रण नाही!

G-7 शिखर परिषदेसाठी सहा वर्षांत पहिल्यांदाच हिंदुस्थानला निमंत्रण नाही!

हिंदुस्थान आणि कॅनडामधील तणावपूर्ण संबंधांची सावली यावेळी G7 शिखर परिषदेवर पडणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी शिखर परिषदेला उपस्थित राहण्याची शक्यता कमी आहे. कॅनडाचे मार्क कार्नी सरकार यावेळी 15-17 जून रोजी अल्बर्टा येथील कनानास्किस रिसॉर्ट येथे G7 शिखर परिषदेचे आयोजन करणार आहे. कॅनडाने अद्याप पंतप्रधान मोदींना शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी निमंत्रण पाठवलेले नाही. याशिवाय मार्क कार्नी प्रशासनाने हिंदुस्थान-कॅनडा संबंध पुन्हा सुरू करण्यासाठी कोणतीही तयारी केलेली नाही.

सप्टेंबर 2023 मध्ये कॅनडाचे माजी पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येमध्ये, हिंदुस्थानी एजंटचा सहभाग असल्याचा आरोप केला होता. यानंतरच हिंदुस्थान आणि कॅनडा या दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले होते. जून 2023 मध्ये कॅनडातील सरे येथे निज्जरची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. हिंदुस्थानने हे सर्व आरोप फेटाळून लावले होते, त्यानंतर दोन्ही देशांनी नंतर एकमेकांच्या राजदूतांना हद्दपार केले.

यंदा एप्रिलमध्ये मार्क कार्नी यांच्या नेतृत्वाखालील लिबरल पक्षाने कॅनडाच्या निवडणुकीत विजय मिळवला, तेव्हा हिंदुस्थानसोबतच्या द्विपक्षीय संबंधांमध्ये सुधारणा होण्याची आशा निर्माण झाली. अलिकडेच कॅनडाच्या नवीन परराष्ट्र मंत्री अनिता आनंद यांनी हिंदुस्थानचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली. त्यामुळेच सध्या परिस्थिती अशी आहे की, सहा वर्षांत प्रथमच पंतप्रधान मोदी जी-7 शिखर परिषदेला उपस्थित राहणार नाहीत.

हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, नवी दिल्ली आणि ओटावा यांच्यात खाजगीरित्या सकारात्मक संदेशांची देवाणघेवाण झाली आहे. परंतु पंतप्रधान मोदी जी-7 शिखर परिषदेसाठी जातील याबाबत मात्र अधिकृत कोणतेच वृत्त आलेले नाही.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;