पोलीस भरतीचं स्वप्न भंगल; ट्रकच्या धडकेत 22 वर्षीय तरुणीचा मृत्यू
चंद्रपूर शहरातील तुकुम-ताडोबा रोडवर सोमवारी संध्याकाळी एक भयंकर अपघात घडला. येथे एका अनियंत्रित ट्रकने फुटपाथवर चढून रस्त्यावरून चालणाऱ्या लोकांना आणि वाहनांना चिरडले. या अपघातात एका 22 वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ट्रक चालवत असताना ट्रकच्या चालकाला अचानक फीट आली. त्यामुळे त्याचे ट्रकवरील नियंत्रण सुटले आणि ट्रक फूटपाथवर चढला. यादरम्यान, ट्रकने फुटपाथवर चालणाऱ्या लोकांना आणि रस्त्यावर उभ्या असलेल्या अनेक वाहनांनाही चिरडले. यामध्ये एका तरूणीचा मृत्यू झाला, तर तीन जण जखमी झाले.
सानिका कुमारे असे या मृत मुलीचे नाव आहे. ती लक्कडकोट येथील रहिवासी होती. तसेच ती पोलीस भरतीची तयारी करत होती. मात्र तिचे स्वप्नांना अखेर पूर्णविराम लागला. या अपघातात जखमी झालेल्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे आणि या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List