Hair Care- केस धुण्याआधी 2 तास मोहरीच्या तेलाने मालिश करा, केसांमध्ये दिसतील हे ‘5’ महत्त्वाचे बदल

Hair Care- केस धुण्याआधी 2 तास मोहरीच्या तेलाने मालिश करा, केसांमध्ये दिसतील हे ‘5’ महत्त्वाचे बदल

केसांच्या आरोग्याची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. केसांमध्ये होणारा कोंडा आणि केसगळती हे अलीकडे खूप सामान्य झालेले आहे. म्हणूनच केसांची काळजी ही योग्यवेळी घेतली तर, आपण केसांचं आरोग्य निरोगी ठेवु शकतो. केसांची काळजी घेण्याचा विचार येतो तेव्हा केसांच्या मालिशबद्दल नक्कीच चर्चा होते. केसांना मसाज करण्यासाठी मोहरीचे तेल खूप फायदेशीर असल्याचे म्हटले जाते आणि ते योग्य पद्धतीने वापरणे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. आंघोळीच्या 2 तास आधी मोहरीच्या तेलाने मालिश केल्याने केसांना कोणते फायदे होतात ते जाणून घेऊया.

 

आठवड्यातून एकदा मोहरीच्या तेलाने मालिश केली तर, त्यामुळे केस मजबूत राहतात. यामुळे केस गळण्याचा धोकाही बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकतो.

ज्यांचे केस खूप कोरडे आहेत त्यांच्यासाठी मोहरीच्या तेलाने मालिश करणे हा एक चांगला पर्याय असू शकतो. आंघोळीच्या 2 तास आधी केसांना मोहरीचे तेल लावा आणि नंतर सौम्य शाम्पूने केस चांगले धुवा. यानंतर तुमचे केस रेशमी राहतील आणि कोरडेपणा निघून जाईल.

केसांच्या चांगल्या वाढीसाठी, पुरेसे पोषण मिळणे आवश्यक आहे आणि त्यासाठी तुम्ही मोहरीचे तेल वापरू शकता. आठवड्यातून एकदा मोहरीच्या तेलाने मालिश केल्यास केस मुळांपासून मजबूत होतात.

केसांमध्ये पोषणाचा अभाव किंवा त्यांची योग्य काळजी न घेतल्यास कधीकधी केस पांढरे होऊ शकतात. पण जर तुम्ही आंघोळीच्या 2 तास आधी केसांना मोहरीच्या तेलाने व्यवस्थित मालिश केली तर केसांची काळजी खूप सुधारते आणि केस पांढरे होण्याचा धोका बऱ्याच प्रमाणात कमी होतो.

मोहरीच्या तेलात असे अनेक गुणधर्म आढळतात, यामुळे केसांमध्ये चमक देखील वाढते. आठवड्यातून एकदाच मोहरीच्या तेलाने मालिश केल्यास केसांची चमक वाढण्यास मदत होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;