भूकंपाचा असाही धक्का! तुरुंगातून 216 कैदी पळाले

भूकंपाचा असाही धक्का! तुरुंगातून 216 कैदी पळाले

भूकंपाच्या धक्क्यामुळे उडालेल्या गोंधळाचा गैरफायदा घेत तुरुंगातील तब्बल 216 कैद्यांनी पलायन केल्याची घटना घडली आहे. पाकिस्तानात घडलेल्या या घटनेमुळे भूकंपाचे धक्के आणि कैद्यांचे पलायन याबाबत चर्चा होत आहे.

पाकिस्तानातील कराची येथील मालीर जिल्हा तुरुंगातून एकूण 216 कैद्यांनी पलायन केले आहे. सोमवारी रात्री शहरात सौम्य भूकंपाचे धक्के जाणवत होता. त्यामुळे घबराट उडाली गोंधळ निर्माण झाला. त्याचा गैरफायदा घेत 216 कैदी पळून गेल्याचे पोलीस आणि तुरुंग अधिकाऱ्यांनी सांगितले. अनेक कैदी भूंकपाच्या धक्क्याने उडालेल्या घबराटीमुळे आधीच त्यांच्या बॅरेकबाहेर आले होते. त्यांनी या अफरातफरीचा आणि गोंधळाचा गैरफायदा घेत पलायन केले.

या घटनेनंतर कारागृहाच्या परिसरात जोरदार गोळीबार झाल्याचे वृत्त आहे. त्यामुळे परिसरात दहशत पसरली आहे. पोलिस आणि रेंजर्सनी परिसराला घेराव घातल्यामुळे राष्ट्रीय महामार्गासह अनेक मार्ग तात्पुरते बंद करण्यात आले आहेत. पोलिस आणि निमलष्करी दलांचा मोठा ताफा काही मिनिटांतच तुरुंगात पोहोचला आणि जवळपासच्या वस्त्या, महामार्ग आणि गावे सील करण्यात आली. मालीरमधील मशिदींमधून घोषणा देण्यात आल्या, पळून गेलेल्या कैद्यांना अटक करण्यासाठी जनतेच्या सहकार्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;