IPL 2025 Final RCB Vs PBKS – फायनलचा थरार अन् सट्टेबाजांचा सुळसुळाट; जगप्रसिद्ध रॅपरने लावला 6 कोटींचा सट्टा

IPL 2025 Final RCB Vs PBKS – फायनलचा थरार अन् सट्टेबाजांचा सुळसुळाट; जगप्रसिद्ध रॅपरने लावला 6 कोटींचा सट्टा

अवघ्या काही तासांनी आयपीएलच्या 18 व्या हंगामाचे विजेतेपद पटकावण्यासाठी आरसीबी (RCB) आणि पंजाब किंग्ज (PBKS) यांच्यात घमासान युद्ध सुरू होणार आहे. दोन्ही संघ पहिल्यावहिल्या विजेतपदासाठी मैदानात उतरणार आहेत. त्यामुळे दोन्ही संघांच्या चाहत्यांमध्ये उत्साह ओसंडून वाहत आहे. आयपीएलचा चाहतावर्ग जगभरात पसरला आहे. त्यामुळे सामन्याच्या निकालावरच नाही तर, प्रत्येक चेंडूंवर, विकेटवर आणि चौकार-षटकारांवर सट्टा लावला जात आहे. या सट्टेबाजांमध्ये जगप्रसिद्ध कॅनेडियन रॅपर ड्रेकचा देखील समावेश असून त्याने आपल्या आवडत्या संघावर 6 कोटींची पैज लावली आहे.

आयपीएलच्या फायनलचा थरार पाहण्यासाठी चाहत्यांची उत्कंठा आता शिगेला पोहोचली आहे. दोन्ही संघांचे चाहते मोठ्या संख्येने नरेंद्र मोदी स्टेडियमवर दाखल झाले आहेत. फक्त हिंदुस्थानातच नाही तर जगभरात दोन्ही संघांचे चाहते आहेत. प्रसिद्ध कॅनेडियन रॅपर ड्रेकने विराट कोहलीच्या RCB वर 6 कोटी 43 लाख रुपयांची पैज लावली आहे. जर RCB ने आयपीएलचे विजेतेपद पटकावले तर, ड्रेक मालामाल होणार आहे. ड्रेकने इन्स्टाग्रावर एक स्किन शॉर्ट शेअर केला आहे. त्याने शेअर केलेल्या स्किनशॉर्टनुसार, ड्रेकने RCB ला विजेतेपदाच दावेदार मानलं असून त्याने RCB च्या विजयावर US$750,000 (6 कोटी 43 लाख रुपये) चा सट्टा लावला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

चर्चगेट रेल्वे स्थानकावरील मॉन्जिनिजच्या दुकानाला आग, धुराचे मोठे लोट; प्रवाशांमध्ये घबराट चर्चगेट रेल्वे स्थानकावरील मॉन्जिनिजच्या दुकानाला आग, धुराचे मोठे लोट; प्रवाशांमध्ये घबराट
चर्चगेट रेल्वे स्थानकावरील मॉन्जिनिजच्या दुकानाला आग लागली आहे. या आगीमुळे स्थानक परिसरात धुराचे मोठे लोट उठत असून प्रवाशांमध्ये घबराट पसरली...
राफेल लढाऊ विमानाचा मुख्य भाग आता हिंदुस्थानात बनणार, टाटा समूहाचा डसॉल्ट एव्हिएशनसोबत करार
Bangalore Stampede चेंगराचेंगरीतील मृतांच्या नातेवाईकांना RCB करणार प्रत्येकी दहा लाखांची मदत
अमेरिकेत 1244 कोटी रुपयांचा अपहार, हिंदुस्थानी वंशाचे तन्मय शर्मा यांना अटक
Healthy Lifestyle : दररोज या 5 पानांचे सेवन केल्यामुळे तुमचं आरोग्य राहिल निरोगी
बोगस कॉलेजसह खासगी क्लासेसकडून पालकांची लुटमार
राज्यात पर्यावरणाची ऐशीची तैशी, आदित्य ठाकरे यांनी यादीच मांडली