स्थानिकांना विश्वासात घेऊन मगच निर्णय घ्या; मुंबईतील प्रस्तावित जेट्टीबाबत आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

स्थानिकांना विश्वासात घेऊन मगच निर्णय घ्या; मुंबईतील प्रस्तावित जेट्टीबाबत आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

गेटवे ऑफ इंडिया ते रेडिओ क्लब यामधल्या भागात होणाऱ्या प्रस्तावित जेट्टीबाबत स्थानिकांना विश्वासात घेऊन, त्यांचे म्हणणे ऐकून मगच त्याविषयी निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे त्यांनी ही मागणी केली आहे.

आपल्या पत्रात आदित्य ठाकरे यांनी लिहिलं आहे की, “अलीकडेच माझी कुलाबा परिसरातील रहिवाशांशी भेट झाली, तेव्हा गेटवे ऑफ इंडिया ते रेडिओ क्लब ह्यामधल्या भागात होणाऱ्या प्रस्तावित जेट्टीबाबत त्यांची मते व त्यांना वाटणाऱ्या चिंता मला समजल्या. या प्रस्तावित जेट्टीबाबात स्थानिकांशी कोणतीही सल्लामसलत न करता, त्यांना विश्वासात न घेता काँक्रीटचे विद्रूप बांधकाम तिथे केले जाणार आहे, ज्यामुळे या ऐतिहासिक वारसा लाभलेल्या परिसराचे कधीही भरून न येणारे नुकसान होईल. असे घडण्याआधी, आपण कृपया इथल्या रहिवाशांचे म्हणणे ऐकावे व योग्य निर्णय घ्यावा, अशी मी आपणास नम्र विनंती करतो.”

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;