Ratnagiri News – पतितपावन मंदिर प्रकरण, भाजप नेत्याला वाचवण्याचा रत्नागिरी शहर पोलिसांचा प्रयत्न; भजनीबुवांची पोलीस अधीक्षकांकडे धाव

Ratnagiri News – पतितपावन मंदिर प्रकरण, भाजप नेत्याला वाचवण्याचा रत्नागिरी शहर पोलिसांचा प्रयत्न; भजनीबुवांची पोलीस अधीक्षकांकडे धाव

ऐतिहासिक पतितपावन मंदिरातून भजनीबुवांना भाजप नेते अ‍ॅड.बाबा परूळेकर यांनी रोखल्यानंतर रत्नागिरीत वातावरण पेटले होते. भजनीबुवांनी तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार करूनही रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सतीश शिवरकर यांनी गुन्हा दाखल केला नाही. उलट भजनीबुवांच्या अर्जाला केराची टोपली दाखवली आहे. यामुळे शहर पोलीस निरीक्षकांचा भाजप नेते अ‍ॅड. बाबा परूळेकर यांना वाचवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप होत आहे. याबाबत भजनीबुवांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांची भेट घेत याबाबत तक्रार केली.

भागोजीशेठ कीर यांनी पतितपावन मंदिर उभारून मंदिर सर्व धर्मियांसाठी खुले केले होते. सर्व धार्मियांसाठी खुले केलेले देशातील हे पहिले मंदिर होते. त्याच पतितपावन मंदिरात 26 एप्रिल रोजी भजनासाठी गेलेल्या भजनीबुवांना भाजप नेते अ‍ॅड. बाबा परूळेकर यांनी अटकाव केल्याची तक्रार भजनीबुवांनी तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्याकडे केली होती. मात्र रत्नागिरी शहर पोलिसांकडून त्या तक्रारीवर कोणतीही कारवाई न झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले.

नवीन पोलीस अधीक्षकांकडून अपेक्षा

रत्नागिरीत नूतन पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांची भजनीबुवांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी भेट घेऊन 26 एप्रिल रोजी पतितपावन मंदिरात झालेला प्रकार सांगितला. भजनीबुवांनी निवेदनही दिले आहे.तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार केल्यानंतरही रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सतीश शिवरकर यांनी भाजप नेते अ‍ॅड. बाबा परूळेकर यांच्यावर गुन्हा दाखल केला नाही. आपण शहर पोलीस निरीक्षकांना कायदेशीर गुन्हा दाखल करण्याच्या सूचना द्या्व्यात अशी मागणी भजनीबुवा आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. यासंदर्भात योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी दिले.

शहर पोलिसांचा फुकटचा सल्ला

सामाजिक सलोखा बिघडवणारी घटना घडूनही रत्नागिरी शहर पोलिसांनी पतितपावन मंदिरात भजनीबुवांना मज्जाव करणाऱ्या भाजप नेत्यांवर गुन्हा दाखल केलाच नाही. उलट धर्मादाय आयुक्तांकडे जाऊन दाद मागा असा फुकटचा सल्ला शहर पोलिसांनी भजनीबुवांना दिल्यामुळे संतापाची लाट पसरली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;