देशासाठी खेळायचं स्वप्न भंगलं, फलंदाजी करताना छातीत चेंडू लागला आणि 12 वर्षीय मुलाचा मृत्यू

देशासाठी खेळायचं स्वप्न भंगलं, फलंदाजी करताना छातीत चेंडू लागला आणि 12 वर्षीय मुलाचा मृत्यू

क्रिकेट खेळणाऱ्या मुलांच सर्वात मोठं स्वप्न असंत, ते म्हणजे देशासाठी खेळायचं. त्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यात लाखोंच्या संख्येने मुलं घाम गाळत आहेत. अशाच एका 12 वर्षीय मुलाचं देशासाठी खेळायचं स्वप्न अपूर्ण राहिलं आहे. फलंदाजी करत असताना छातीला चेंडू लागल्याने तो जागीच कोसळला. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण त्याचा मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत किशोर उत्तर प्रदेशातील फिरोजाबादला रहिवासी आहे. सोमवारी (02 जून 2025) फ्युचर क्रिकेट अॅकेडमीकडून फायनलचा सामना खेळण्यासाठी तो टूंडला येथे गेला होता. याच दरम्यान दु:खद घटना घडली. फलंदाजीसाठी किशोर मैदानात उतरला आणि फलंदाजी करत असताना चेंडू त्याच्या छातीत लागला. चेंडू वेगात छातीत लागल्याने तो जागीच कोसळला. त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात नेले असता त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पोलिस या घटनेची चौकशी करत आहे.

फिट्टमफाट! गुकेशने आठवडाभरातच आपल्या पराभवाचा घेतला बदला, नंबर वन मॅग्नस कार्लसनवर मिळवला पहिला क्लासिक विजय

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;