Santosh Deshmukh Case – वाल्मीक कराडला मकोका लागणार की नाही? दोषमुक्तीच्या अर्जावर 17 जूनला निर्णय

Santosh Deshmukh Case – वाल्मीक कराडला मकोका लागणार की नाही? दोषमुक्तीच्या अर्जावर 17 जूनला निर्णय

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंगळवारी बीडच्या जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी झाली. सरकारी पक्षाचे वकील उज्ज्वल निकम यांच्या उपस्थितीत युक्तिवाद झाला. संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोप निश्चिती बाबत पुरेसे पुरावे असून आरोप निश्चिती करून घ्यावी, असा अर्ज उज्वल निकम यांनी न्यायालयाला सादर केला. अद्याप सरकारी पक्षाकडून डिजिटल एव्हिडन्स मिळाले नसल्याचं वाल्मीक कराडच्या वकिलांकडून सांगण्यात आले. वाल्मीक कराडच्या दोष मुक्तीच्या अर्ज न्यायालयात प्रस्तावित केला आहे. या दोन्ही बाबींवर 17 जून रोजी सुनावणी होणार आहे.

डिस्चार्ज एप्लीकेशनच्या सुनावणीला वेळ लागू शकतो. येणाऱ्या तारखेला कोर्टात इतर अर्ज जे पेंडीग आहेत त्यावर सुनावणी होणार आहे. डिस्चार्ज एप्लीकेशनवर सुनावणी घेण्याअगोदर इतर अर्जावर सुनावणी घ्या, असं कोर्टाचे निरीक्षण आहे. सरकारी पक्षाच्या वकिलाने मालमत्ता जप्ती संदर्भात अर्ज केले आहेत. कोर्टाच्या निरीक्षणानुसार 17 जूनला इतर अर्जावर एकत्रितपणे सुनावणी होणार असल्याची माहिती वाल्मीक कराडचे वकील मोहन यादव यांनी दिली.

वाल्मिक कराडला मकोकाचा नियम लागू होतो का? यासंदर्भात 17 तारखेला निर्णय होईल. 17 तारखेला दोन्ही पक्षांचे ऐकून न्यायालय निर्णय देईल. वाल्मीक कराडची सर्व स्थावर मिळकत चल आणि अचल जप्तीसाठी अर्ज दिला होता. त्यांच्या वकिलांनी न्यायालयात उत्तर दिले आहे. त्यावर 17 तारखेला सुनावणी होईल. या खटल्यात मोकोकामधून दोषमुक्त करावे, असा अर्ज वाल्मिक कराडचा होता. मकोकामधून मला दोषमुक्त करावे, असा वाल्मिक कराडचा अर्ज आहे. त्यावर बचाव पक्षाने सांगितले की, वाल्मिक कराडला मकोकातून मुक्त करावं, यावर पहिले सुनावणी घेण्यात यावी. बचाव पक्षाच्या या मागणीवर आम्ही कोणतीही हरकत नसल्याचं सांगितलं. यावर 17 तारखेला युक्तिवाद होईल, अशी माहिती उज्ज्वल निकम यांनी दिली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;