नरेंद्र सरेंडर! आणि जी हुजूर करत मोदींनी ट्रम्पच्या इशाऱ्याचं पालन केलं; राहुल गांधींनी केली सडकून टीका

नरेंद्र सरेंडर! आणि जी हुजूर करत मोदींनी ट्रम्पच्या इशाऱ्याचं पालन केलं; राहुल गांधींनी केली सडकून टीका

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा फोन आला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लगेच सरेंडर झाले, अशी टीका लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पाकिस्तानसोबत शस्त्रसंधीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे. राहुल गांधी मध्य प्रदेशची राजधानी भोपाळच्या दौऱ्यावर आहेत. तिथे मंगळवारी त्यांनी पक्षाच्या आमदार आणि जिल्हाध्यक्षांसोबत संघटनेच्या निर्मितीबाबत बैठक घेतली. यानंतर काँग्रेस कार्यकर्ता परिषदेला संबोधित करताना त्यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला.

राहुल गांधी म्हणाले की, “भाजप-आरएसएसच्या या स्वभावाचा इतिहास साक्षीदार आहे. ते नेहमीच झुकतात. अमेरिकेच्या धमक्यांना न जुमानता हिंदुस्थानने 1971 मध्ये पाकिस्तानचे दोन तुकडे केले होते. काँग्रेसचे सिंह आणि सिंहिनी महासत्तांशी लढतात, ते कधीही झुकत नाहीत.”

राहुल गांधी पुढे म्हणाले की, “देशाची संपूर्ण संपत्ती काही निवडक लोकांच्या हाती सोपवली जात आहे. सर्वत्र फक्त दोन-तीन लोकच दिसतात, जणू काही त्यांच्याशिवाय देशात दुसरे कोणतेही उद्योगपती नाहीत. देशातील 90 टक्के लोकांकडे दुर्लक्ष करून सर्व पैसा काही निवडक लोकांच्या हाती सोपवला जात आहे.”

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;