मग संसदेच्या विशेष अधिवेशनाची मागणी ट्रम्पकडे करायची का? संजय राऊत यांचा थेट सवाल

मग संसदेच्या विशेष अधिवेशनाची मागणी ट्रम्पकडे करायची का? संजय राऊत यांचा थेट सवाल

जर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या सांगण्यावरून शस्त्रसंधी झाली असेल तर मग संसदेत विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी त्यांच्याकडेच करायची का? असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तसेच विरोधी पक्षांचा आवाज हा जनतेचा आवाज आहे असेही संजय राऊत म्हणाले.

आज इंडिया आघाडीची बैठक पार पडली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, 16 पक्षाच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. हे कुठलेही साधे पत्र नाही. हा जनतेचा आवाज आहे. आतापर्यंत देशात काय झालं यावर चर्चा करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवा अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे.

जर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या सांगण्यावरून शस्त्रसंधी झाली असेल तर विरोधकांच्या मागणीवरून विशेष संसद का बोलावले जात नाही? आता त्यासाठी पण ट्रम्प यांच्याकडे जावं लागेल का ? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;