भोसरीच्या आमदारांचा वस्ताद अजितदादाच; लांडगेंच्या टीकेला प्रवक्ते उमेश पाटलांचे प्रतिउत्तर

भोसरीच्या आमदारांचा वस्ताद अजितदादाच; लांडगेंच्या टीकेला प्रवक्ते उमेश पाटलांचे प्रतिउत्तर

संतपीठाच्या एका चांगल्या कार्यक्रमात भोसरीचे भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी आपल्या अकलेचे दिवाळे काढून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर तिखट शब्दात टीका केली. ज्या पवारांनी लांडगे यांना राजकारणात आणले, त्यांना नगरसेवक, स्थायी समितीचे सभापती केले, त्यांच्याबद्दल खालच्या पातळीची भाषा वापरणाऱ्या लांडगेंच्या डोक्यात सत्तेची हवा गेल्याने काहीही बरळत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली. तसेच लांडगे पैलवान असले तरी त्यांचे वस्ताद अजितदादाच असून, वस्ताद हा नेहमी एक डाव राखून ठेवत असतो, असा इशाराही पाटील यांनी दिला.

शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पिंपरी, खराळवाडी येथील पक्ष कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेला माजी नगरसेवक अजित गव्हाणे, राहुल भोसले, नाना काटे, श्याम लांडे, पंकज भालेकर, डब्बू आसवाणी, महिला शहराध्यक्षा कविता आल्हाट, फजल शेख आदी पदाधिकारी उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने बुधवारी (दि. 18) संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत नामदेव महाराज भेटीचे समूहशिल्प व संतसृष्टीचे लोकार्पण, संतपीठ येथील प्रेक्षागृह व कलादालन लोकार्पणासह विविध प्रकल्पांचे भूमिपूजन, उद्घाटने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाली.

या कार्यक्रमात भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव न घेता मी पैलवान आहे, कोणाला घाबरत नाही, कोणी अंगावर आला तर त्याला अंगावर घ्यायची सवयच आहे, शहरातील नागरिकांनी तुम्हाला सत्ता दिली नसती तर तुम्ही काय घंटा केले असते? अशा शब्दांत पवारांवर टीका केली होती.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमधील वाद आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणखीनच चिघळणार असल्याचे बोलले जात आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;